विकिपीडिया:मासिक सदर/जानेवारी २००९

मुखपृष्ठ सदर लेख
एर अरानचे ए.टी.आर. ७२ प्रकारचे विमान झेपावताना
एर अरानचे ए.टी.आर. ७२ प्रकारचे विमान झेपावताना

ए.टी.आर. ७२ हे ए.टी.आर. या विमान तयार करणार्‍या कंपनीचे छोट्या पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

या विमानाची प्रवासीक्षमता ७२ असून ते चालवण्यासाठी दोन वैमानिक असतात.

ए.टी.आर. ७२ची रचना ए.टी.आर. ४२ प्रकारच्या विमानावर आधारित आहे. यासाठी विमानाची लांबी ४.५ मीटर (१४ फूट ९ इंच) वाढवण्यात आली, पंखाचा विस्तार वाढवण्यात आला व जास्त क्षमतेची इंजिने लावण्यात आली. याशिवाय इंधनक्षमताही १० टक्क्यांनी वाढवली गेली. ए.टी.आर. ७२ प्रकारच्या विमानाची घोषणा १९८६त केली गेली व ऑक्टोबर २७, इ.स. १९८८ रोजी या विमानानी पहिले उड्डाण केले. एक वर्षाने ऑक्टोबर २७, इ.स. १९८९च्या दिवशी फिनएरने या प्रकारच्या विमानातून प्रवासी ने-आण करण्यास सुरुवात केली.

जानेवारी २००७च्या गणतीनुसार ३२३ ए.टी.आर. ७२ विमाने विविध विमानकंपन्यांना विकण्यात आली आहेत व ११३ विमानांची मागण्या अपूर्ण आहेत.

७२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या या विमानांमध्ये सहसा प्रवाश्यांना मागील दारातून चढवले व उतरवले जाते तर पुढच्या दारातून सामान हाताळले जाते. फिनएर याला अपवाद असून त्यांची ए.टी.आर. ७२ प्रकारची विमाने प्रवासी पुढील दारातून तर सामान मागच्या दारातून हाताळतात. मागच्या दारातून प्रवासी चढ-उतार करीत असताना विमानाच्या शेपटाखाली आधार द्यावा लागतो. हा आधार नसल्यास विमानाचे नाक उचलले जाण्याची शक्यता असते.

ए.टी.आर. ७२ला ऑक्झिलरी पॉवर युनिट नसते पण त्याच्या प्रॉपेलरना अवरोधक असतात. हे अवरोधक लावले असता विमानाचे इंजिन सुरू असूनही प्रॉपेलर फिरत नाहीत (व विमान पुढे सरकत नाही) आणि तरीही इतर उपकरणांना वीज मिळू शकते. याप्रकारे विमान चालू ठेवण्याला हॉटेल मोड म्हणतात. यामुळे ए.पी.यू. लावण्याचा खर्च व वजन टाळता येतात.

पुढे वाचा...