विकिपीडिया:जुन्या संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन व विकिस्रोत कार्यशाळा

आयोजक संपादन

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL), ज्ञान प्रबोधिनी आणि द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नॉलेज (CIS-A2K) यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून प्रत्यक्ष अनुभव देत प्रशिक्षण देणारी कार्यशाळा

कालावधी संपादन

शुक्रवार दि. १७ व शनिवार १८ फेब्रुवारी २०१७

सकाळी १०.३० ते २.३० (चहापान व जेवणाची सोय केली आहे)

स्थान संपादन

दि.१७/२/१७ - ज्ञान प्रबोधिनी - सदाशिव पेठ,पुणे (बैठक कक्ष, पाचवा मजला) दि.१८/२/१७ - महाराष्ट्र ज्ञान मंडळ (MKCL), ICC Trade Tower, 'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे

उद्दिष्टे संपादन

दि.१७/२/१७

  1. संदर्भ ग्रंथांची निवड करणे, प्राधान्यक्रम ठरविणे, वर्गीकरण करणे
  2. जुन्या ग्रंथ संपदेचे संवर्धन करण्यासाठी डीजीटायझेशन करणे
  3. प्रताधिकार , मुक्त परवाना इ. कायदेशीर बाबी
  4. सदर ग्रंथ संदर्भासाठी इंटरनेटवर उपलब्ध करणे, विविध संकेतस्थळे परिचय

दि.१८/२/१७

  1. PDF मजकुराचे ओसिआर टूल वापरून टेक्स्ट मध्ये रुपांतर करणे
  2. साहित्य प्रथम अर्काईव्हज या संकेत स्थळावर चढविणे
  3. विकिस्रोत वर आणण्यासाठीची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करणे
  4. अंतिमत: हे ग्रंथ अधिकृतरीत्या इन्टरनेटवर प्रकाशित करणे

साधन व्यक्ती संपादन

प्रा.सदानंद मोरे, प्रा.माधव गाडगीळ, विजय सरदेशपांडे, बोधिसत्त्व (बंगाली विकिस्रोत), अनंत सुब्राय (कन्नड विकिस्रोत),उदय पंचपोर, अरविंद नवरे, सुबोध कुलकर्णी

सहभागी सदस्य संपादन

महाराष्ट्रातील १६ ग्रंथालयांचे प्रतिनिधी