विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३२

Speedy Deletion चा सरसकट उपयोग ?

संपादन
गुळसडी नावाचा एक लेख कुणा अनामिक सदस्यांने बनवला आहे , त्यानंतर गावापासून जवळ असलेल्या जाळेवस्ती नावाच्या वस्ती बद्दल त्याने लेख बनवला, दोन्ही ठिकाणची माहिती संदर्भा शिवाय असलीतरी विश्वकोशीयतेचे नियम मोडत होती असे दिसत नाही परंतु जाळेवस्ती लेखावर पान काढा सुचना लावली गेली नंतर मजकुर काढला गेला. हे खरे आहे कि जाळेवस्तीतील मजकुर गुळसडी लेखात वेगळ्या विभागात हलवून पुर्ननिर्देशन करता आले असते. किंवा उल्लेखनीयता साचाचा उपयोगकरून उल्लेखनीयतेबद्दल शंका उपस्थीत करून पान तयार करणार्‍यास त्याचे मत मांडण्याची संधी देता येते.
आपण मराठी विकिपीडियावर उल्लेखनीयता संदर्भात अजून फारशी चर्चा घडवली नाही आहे.चर्चा पानांवर कारण न देता अथवा लेखकास पुर्वसुचना न देता वगळण्याच्या केवळ सुचना लावणे नवीन सदस्यांना भांबावणारे आणि त्यातील बर्‍याच जणांना लेखना पासून परावृत्त करणारे ठरू शकते. लेख वगळणे किंवा तशी सुचना लावण्यापूर्वी त्या लेखास साधनपेटीतून येथे काय जोडले आहे हे पाहिल्यास पान तयार करणार्‍या सदस्याच्या भूमिकेचा अंदाज बांधण्यास सहाय्य होऊ शकते पण येथे काय जोडले आहे हे पहाण्याचे आपण पहाणे टाळतो आहोत का ?
एक एक नवा लेखन करणारा सदस्य मिळण्याची मारामार आहे लिहित्यांना मार्गदर्शन करण्यापुर्वीच आपण कटवत नाही आहोत ना? एकुण या विषया बद्दल सर्वच जाणकार विकिसदस्यांनी पुर्नविचार करावा असे वाटते माहितगार १७:१०, १ जानेवारी २०११ (UTC)

लिहित्यांना मार्गदर्शन करण्यापुर्वीच आपण कटवत नाही आहोत ना? एकुण या विषया बद्दल सर्वच जाणकार विकिसदस्यांनी पुर्नविचार करावा असे वाटते - अगदी सहमत-Manoj ०३:१०, १७ जानेवारी २०११ (UTC)

आशयघनता

संपादन

मराठी विकिपीडियावर आपण अनेकदा लेखसंख्या वि गुणवत्ता ही चर्चा केलेली आहे. आपल्यात या दोन्हीपैकी कोणता निकष जास्त महत्त्वाचा याबद्दल मतभेद असले तरीही दोन्ही महत्त्वाचे असल्याचे एकमत आहे. लेखसंख्या आपल्या सांख्यिकी पानावर कळते पण गुणवत्ता कशी कळावी याबद्दल साशंकता असणे साहजिक आहे.

विकिमीडियावरील विकिपीडियांच्या तुलनात्मक सांख्यिकी पानावर एकूण लेख, पाने, संपादने, इ. बरोबरच आशयघनता (depth) हेही एक परिमाण मोजले जाते. यात विकिपीडियावरील मजकूराची गुणवत्तेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न असतो. यासाठी एक किचकट असे समीकरण ठरवण्यात आलेले आहे जे येथे दिले आहे

आशयघनता - (Edits per Article*(Pages - articles)/Articles * (1 - Articles per Page)): 19.051503859447

वर उल्लेखलेल्या पानावर हा आकडा पूर्णांकाच्या स्वरुपात दाखवला जातो व दर काही दिवसांनी तो तपासून (बदल असल्यास) बदलला जातो. हा आकडा आपल्याला लगेच उपलब्ध असला तर त्याकडे रोजचेरोज लक्ष देणे सोपे जाईल व गुणवत्तेकडे (कधीकधी) होणारे दुर्लक्ष कमी होईल या हेतूने मी हे समीकरण आपल्या सांख्यिकी पानाच्या तळाशी घातलेले आहे. तेथील आकडा अद्ययावत तसेच १/१०० अब्ज (१x१०-१२)इतका अचूक असेल.

तरी अधूनमधून या आकड्याकडे लक्ष ठेवून गुणवत्ता घसरते आहे असे दिसल्यास आपण लेखसंख्या वाढवण्याचा वेग किंचित कमी करून गुणवत्ता वाढवण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.

अभय नातू २२:११, ७ जानेवारी २०११ (UTC)

मराठी विकिपीडियावर लेखना पेक्षा लेखसंख्या वाढवत जाण्याकडे अधीक कल रहात आला आहे, वस्तूतः मी या गोष्टीचा समर्थक नसलो तरी हि लेखशीर्षक (संख्या) वृद्धी तुम्ही संकल्प यांच्या देखरेखी खाली होत असल्यामुळे किमान शीर्षकांच्या पातळीवर शुद्धलेखनाबद्दल आश्वस्तता मिळते हा फार मोठा फायदा मराठी विकिपीड़ियास झाला आहे हे निश्चीत.
सध्या वर्गीकरण आणि विस्तार साचांमुळे मराठी विकिपीडियाची आशय घनता तांत्रीक दृष्ट्या बरी येण्याचा संभव आहे पण वाचकाभिमूखतेच्या दृष्टीने हि गोष्ट समाधानकारक नाही.जास्त लेख संख्या आपल्याला गूगलवरून शोधत आलेल्या व्यक्तिची पहिली भेट घडवते पण वाचक म्हणून म्हणून माझा अनुभव सकारात्मक न रहाण्याचा शक्यता आहे. काही अधुरे लेख लोकांना लिहिण्यास प्रोत्साहीत करतात हे नक्की पण साधारणतः ९०% लेखांमध्ये किमान एक परिच्छेदभर तरी लेखनाची गरज आहे. ५% लेख एका वाक्यावर केवळ २% काहीही न लिहिता नवनिर्मिती २% भाषांतरांच्या प्रतीक्षेत अशी स्थिती असावी
लेखनाच्या बाबतीत फारच पिछाडीवर पडणे सयूक्तीक नाही या दृष्टीने मी माझा प्रस्ताव आहे की केवळ मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने जी लेख निर्मीती कोणत्याही लेखना शिवाय होते ती होऊ द्यावी केवळ वर्गीकरण आणि इंग्रजी विकिशी आंतर विकिदूवा हे आवश्यक ठरवावेत.
विश्वकोशीय आणि शुद्ध लेखनात बसणारी नवशिक्यांकडून होणारी पहिली लेख निर्मिती ही बंधनातून वगळावी ,पण इतर सर्व लेख नवनिर्मितीकरिता किमान एक परिच्छेद लेखनाचा नियम आवश्यक संकेत म्हणून मराठी विकिपीडियाने या पुढे स्विकारण्याची गरज आहे असे माझे मत आहे.

माहितगार २२:४४, ७ जानेवारी २०११ (UTC)

माहितगार यांच्या वरील मताशी सहमत. वाढदिवसाच्या माहोलनंतर गेल्या २-४ दिवसांत अनेक नवे सदस्य दाखल होताना दिसताहेत. त्यांना शिकवण्याचे,शिस्तीत बसवण्याचे काम होण्याआधी लेखनिर्मितीत प्रोत्साहन देणे येथे लेखन कसे करावे याच्या वाटा दाखवणे गरजेचे आहे. आशयघनता आली नाही तर नुसती लेखपानांची संख्या वाढवून उपयोग नाही, असे वाटते. - Manoj ०३:०६, १७ जानेवारी २०११ (UTC)

विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन!

संपादन

नमस्कार मंडळी!

विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त (१५ जानेवारी, इ.स. २०१०) सर्वांचे अभिनंदन! जोमाने दर्जेदार माहिती भरूया. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:२५, १४ जानेवारी २०११ (UTC)

मराठी विकिपीडियाची पुढची १०, नव्हे शेकडो, वर्षे उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही शुभकामना तसेच हा माहितीसाठा जगातील प्रमुख संदर्भस्थळांतील एक व्हावा ही इच्छा आणि आशा.
अभय नातू १७:५२, १४ जानेवारी २०११ (UTC)

विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी

संपादन

नमस्कार मंडळी!

विकिपीडिया उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्ताने सध्या विकिपीडिया प्रकल्पाविषयी मराठी प्रसारमाध्यमांमधून विकिपीडिया उपक्रमाला व त्यातील मराठी विकिपीडिया प्रकल्पालाही प्रसिद्धी लाभत आहे. त्यामुळे सदर बातम्यांचे/ वार्तांकनांचे संकलन करण्याच्या हेतूने विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी हे पान विकिपीडिया नामविश्वात बनवले आहे. त्यावर मराठी विकिपीडिया व एकंदरीत विकिपीडिया उपक्रमाबद्दल छापून येणारी नवी वार्तांकने, ताज्या बातम्या यांची सदस्यांनी भर टाकत जावी, अशी विनंती.

(विशेष सूचना : या पानावर ब्लॉग, सार्वजनिक फोरमांवरील दुवे नोंदवू नयेत. केवळ नोंदणीकृत वृत्तपत्र/प्रसारमध्यमांमध्ईल प्रसिद्धीचीच दखल घ्यावी.)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:०९, १७ जानेवारी २०११ (UTC)

गणित प्रकल्प

संपादन
मला गणित विषयासंबंधी लेख लिहायचे आहेत.... मला त्यावर विकिपीडिया:गणित लेख प्रकल्प सुरू करायला आवडेल किंवा असा प्रकल्प आधीच सुरू असेल तर मला त्यात सहभागी व्हायला आवडेल....
कृपया मला ह्या बाबतीत सहाय्य हवे..
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Aniruddha22Paranjpye ११:४४, २२ जानेवारी २०११ (UTC)~~

नविन विपी लेखकांन साठी चित्रफीती द्वारे मार्गदर्शन करावे

संपादन
  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
विपी वर लेखन करू इच्छिणाऱ्या नव्या लेखकांना अनेक छोट्या छोट्या समस्यांना सामोरे जावे लागते. असे निदर्शनास आले आहे की बहुतौष समस्या ह्या उपलब्ध सोई व सुविधांच्या माहिती आभावी निर्माण होतात. जर आपण "मला मदत करा ...!" अशा आशयाचा प्रकल्प सुरू केला, व त्या आंतर्गत पानांवरील सोई व सुविधांन संबंधि चलचीत्रफिती तयार करून युट्युब वर संग्रहित केल्या आणी ह्या लक्षपानांचे दुवा जोडनीकरण "मला मदत करा ...!" प्रकल्प पानावर केल्यास, बाह्य संकेतस्थळामार्फत आपण विपी वरिल नव्या लेखकांना बहुमूल्य मदत शकू.





धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
राहुल देशमुख १५:२६, २५ जानेवारी २०११ (UTC)~~

कल्पना चांगली आहे

संपादन

चांगली कल्पना आहे. बघू... मला असे काही जमल्यास एखादा व्हिडिओ बनवून बघेन. दरम्यान आपल्याला काही मदत हवी असल्यास विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ येथे किंवा इथे चावडीवरील जुन्यासंग्रहांत थोडेसे चाळून बघावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:११, २६ जानेवारी २०११ (UTC)


--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:११, २६ जानेवारी २०११ (UTC)

काही पर्याय

संपादन

अशा आशयाच्या चीत्राफितींना स्क्रीनकास्ट किंवा स्पोकन टयूटोरीअल्स असेही संबोधतात येथे दिलेल्या बाह्य दुव्या मार्फत आपणास काहीमदत होऊशकेल. मी स्वतः ह्या प्रकल्पाशी निगडीत असल्याने जर काही स्वयंम सेवक समोर येत असतील तर ह्या प्रकल्पा आंतर्गत मदत देता येईल. ( भारत सरकार द्वारा तात्काळ आर्थिक मदत पण देता येऊ शकेल.) आपणाकडे काही कल्पना असल्यास व आपणास योग्य वाटल्यास कळवावे.

सहकार्यासाठी तत्पर

--   राहुल देशमुख १८:२५, २६ जानेवारी २०११ (UTC)

संदर्भासाठी व मराठी टंकलेखनासाठी सोपी व उत्तम ऑन लाईन साकेंतिक स्थळाची मदत यादी

संपादन
  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
                                       "मला मदत...!" नावाचा प्रकल्प सुरु करवा    
असे निदर्शनात येत आहे की विपी वर सहकार्य करण्याची इच्छा असणार्या मराठी प्रेमींनमध्ये मराठी टंकलेखन व काही अडलेल्या शब्दांना उत्तम पर्यायी शब्द उपलब्ध नहोणे ह्या प्रमुख अडचणी आहेत. आपण जर "मला मदत...!" नावाचा प्रकल्प सुरु करून त्या द्वारे ह्या तर्हेची सेवा देणाऱ्या उत्तम सांकेतिक स्थळाची यादी पसिद्ध केली (जी कालानरूप लेखक वृधींगत करतीलच) तर मराठी विपीला अधिक उत्तम प्रतिसाद मिळण्यास आणि अधिका अधिक लोक ह्या अभियानात जोडले जाण्यास मदत होईल.


धन्यवाद!
  राहुल देशमुख १४:२७, २६ जानेवारी २०११ (UTC)~~

नमस्कार,

मराठी टंकलेखनासाठी विकिपीडिया:How to use Devanagari या पानावर बरीच माहिती आहे. विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञा येथे काही इंग्लिश-मराठी शब्द आहेत. जर येथे प्रतिशब्द मिळाला नाही तर इंग्लिश शब्द लिहावा व {{मराठी शब्द सुचवा}} ह साचा त्या शब्दाच्या जवळ लावावा.

अभय नातू १५:३७, २६ जानेवारी २०११ (UTC)

नमस्कार,

अभयजी चावडीतील चर्चेत दिलेल्या मार्गदर्शना बद्दल आभारी आहोत. माझा मुद्दा थोडा अजून पुढे जाणारा आहे. विपी वर काहीसुविधा उपलब्ध आहेतच पण बर्याच सुविधा ह्या आधारभूत स्वरुपात आहेत. गेल्या आठवड्यात माझ्या विकिपीडिया इंडिया च्या मंडळींशी झालेल्या बैठकीत हा मुद्दा प्रामुख्याने चर्चिल्या गेला, विपी हे मूळतः कंटेंट रिप्राँसिटरी आहे या मुळे सर्च इंजिन, डेटा मायनिंग, इंटेलिजन्स, एनलपी, डिशनरी आदी बाबीन मध्ये मिडिया विकी ला मर्यादा आहेत. काम सुरु आहे पण डेटा भरपूर असल्याने बर्याच ठिकाणी पोर्तिंग अशक्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत लेखकांच्या सोयीसाठी इतर आधुनिक प्रज्ञावान (इंटेलिजन्ट) साधनांचा वापर करण्याची माहिती देणारे प्रकल्प सुरुकरण्याची मी विनंती करीत आहे. उदारणार्थ आपण ह्या सांकेतिक स्थळी भेट देऊन पारीक्षण करून पहा आपणास योग्य वाटल्यास अशाच अनेक सुविधांचा संग्रह आपण विपी लेखकांसाठी उपलब्ध कुरून देऊ.
धन्यवाद!

राहुल देशमुख १४:२७, २६ जानेवारी २०११ (UTC)~~

राहुल,
पोर्टिंग म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे? भाषांतर कि आणखी काही? शोधासाठी विकिपीडियावरील आत्ताचे शोधयंत्र (ज्यासाठी गूगलने तांत्रिक मदत केलेली आहे) हे बरे दिसते आहे. डिक्शनरीसाठी विक्शनरी सहप्रकल्प आहेच. डेटा मायनिंग, एनएलपी, इ. साठी येथील मजकूराचा डम्प हवा असल्यास तोही उपलब्ध करुन देता येईल.
कोणत्याही नवीन साधनाचे, ज्याने येथील संपादन/संवर्धन सोपे होईल, येथे स्वागतच आहे. आणि त्यासाठीचा प्रकल्प सुरू करण्यास तर काहीच आडकाठी नाही. विकिपीडियावरील सध्याच्या एखाद्या प्रकल्प (बावन्नकशी, भाषांतर, क्रीडा, इ) पाहून त्यातील आराखडा उचलला तर काम थोडेसे सोपे होईल. अर्थात, नवीन प्रकल्पाचा साचा तंतोतंत यांसारखाच पाहिजे हा आग्रह नाही.
मदत लागली तर कळवालच.
अभय नातू १६:४९, २७ जानेवारी २०११ (UTC)
नमस्कार,
अभयजी आपल्या अभिप्राया करिता धन्यवाद. मला पोर्टिंग म्हणजे कोड पोर्टिंग अभिप्रेत होते.

विकिपीडिया बाबत दोन दिशेने काम करता येते एक तांत्रिक व दुसरे म्हणजे लेखन संपादन/संवर्धन आदी. आम्ही आय आयटी बॉम्बे तर्फे डेटा मायनिंग, एनएलपी वर विकिपीडिया साठी काम करीत आहोत पण या गोष्टींना प्रत्यक्षात येण्यास काही काळ लागेल. दरम्यान लेखन संपादन/संवर्धन सोपे करण्या साठी आपण इतर उपलब्ध मुक्त तृतीय पक्षी साधनांना प्रोत्साहन द्यावे का ? व तसे करण्यासाठी काही पाने लिहावीत का ? विपीच्या तत्वात ते मान्य होईल का ? कुपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!

राहुल देशमुख १८:१९, २७ जानेवारी २०११ (UTC)

राहुल,
कृपया माझ्या नावाला जी लावू नका....मला उगीचच पांढरा सदरा, पायजमा, टोपी, लाल भडक कपाळभर टिळा, हातात २५,००० रुपयांचा मोबाइल घेउन स्कोडा कारमधून साहेबांच्या भेटीसाठी निघाल्यासारखे वाटते...:-) :-)
माझ्या मते तांत्रिक व लेखनिक (system v content) प्रयत्न हे एकमेकांस पूरकच आहेत आणि दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. तुम्ही करीत असलेल्या कामाबद्दल वाचून अधिक जाणून घेण्याची उत्सुकता (व जमल्यास हातभार लावण्याची इच्छा) वाटली. विकिपीडिया/मिडीयामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी मेटाद्वारे प्रयत्न करावे लागतील (मेटाकुटी नव्हे..) कारण मिडियाविकी सॉफ्वेरमधील तांत्रिक बदल विकिमीडिया आपल्या सगळ्याच प्रकल्पांना (२७०+ विकिपीडिया, विक्शनरी, विकिक्वोट्स, इ) उपलब्ध करतात. जर हे बदल वरपांगी (मिडीयाविकि सॉफ्टवेरला प्लगइन होणारे) तर क्वचित ते एखाद्या प्रकल्पावर (जसे मराठी विकिपीडिया) उपलब्ध करुन देता येतात.
तृतीयपक्षी साधनांना प्रोत्साहन दोन-तीन प्रकारे देता येईल.
१ त्या साधनांबद्दल लेख लिहिणे, उदा बरहा, गूगल ट्रांसलेशन टूलकिट, इ.
हे लेख लिहिताना माहिती देणे हाच उद्देश राखून जाहिरात न करणे हे महत्वाचे आहे.
२ विकिपीडिया नामविश्वातील सहाय्य लेखांमध्ये ही साधने कशी मिळवावी, कशी वापरावी, काय काळजी घ्यावी, याबद्दल माहिती घालणे.
३ अशी साधने असलेल्या संकेतस्थळांना किंवा व्यक्तींना त्यांच्या साधनाला मराठी विकिपीडियावर प्रोत्साहन देत असल्याचे कळवणे.
अनेकदा असे केल्यावर अशा व्यक्ती/संस्था आपणहून अधिक मोलाची माहिती किंवा मदत करतात.
अभय नातू १८:५९, २७ जानेवारी २०११ (UTC)
ता.क. पांढरा सदरा, पायजमा, टोपी हा पोशाख करण्यात काहीच गैर नाही. मी (राजकारणी नसून सुद्धा) अनेकदा हे घालतो. :-}

मराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये पिडीएफ वाचता येत नाही ...!

संपादन
  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
                                      मराठी 'विकिबुक्स'मध्ये ग्रंथ निर्मिती व स्मस्या
नमस्कार,

मराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये ग्रंथ निर्मितीची सुविधा आहे. या ठिकाणी पाने गोळाकरून पिडीएफ मध्यमात निर्यात केले असता, उतरवलेल्या पिडीएफ दस्तावेजास वाचता येत नाही. बरीच मरठी अक्षरे अयोग्य रीतीने बदली केल्याने (लिपी(फॉन्ट)बदल समस्येमूळे) ह्या सुविधेत बहुतेक अधिक सुधाराची गरज आहे.


धन्यवाद!
  राहुल देशमुख १६:४७, २६ जानेवारी २०११ (UTC)~~

लोगो आवृ.२

संपादन

नमस्कार मंडळी!

विकिमीडिया फाउंडेशनाने विकिपीडियांसाठी आवृत्ती क्र. २ काढताना जुलै इ.स. २०१० मध्ये भारतीय भाषांमधील विकिपीडियांसाठी खास नवे लोगो निर्मिले आहेत. गेल्या सहा महिन्यांत केवळ उर्दू, तेलुगू, बांग्ला व मल्याळम विकिपीडियांनी दुसर्‍या आवृत्तीचे लोगो आपल्या संकेतस्थळांवर लावले आहेत. आता अन्य भारतीय भाषांतील विकिपीडियांनीही नवे लोगो अंगिकारावेत, अशी आठवण विकिमीडिया-इंडिया मेलिंग लिस्टीवर करून देण्यात आली आहे. मराठी विकिपीडियाचा नवा लोगो File:Wikipedia-logo-v2-mr.png येथे असून, तो इकडे लावायचा असल्यास कुठे बदल करावा लागेल?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:४०, ३१ जानेवारी २०११ (UTC)

लोगो (मानचिह्न) बदलण्यासाठी नवीन चित्र Wiki.png याची नवीन आवृत्ती म्हणून चढवावे.
अभय नातू १४:३३, ३१ जानेवारी २०११ (UTC)
बदल केला आहे. हे चित्र सुरक्षित असून फक्त प्रचालक यात बदल करू शकतात.
अभय नातू १४:४२, ३१ जानेवारी २०११ (UTC)

१ मे, २००३

संपादन

मेटावरील मंडळींनी मेटाकुटी(हा!) करुन मराठी विकिपीडियावरील सगळ्यात जुना (आत्तापर्यंतचा तरी) बदल शोधून काढला आहे. त्यानुसार मराठी विकिपीडियाचा जन्मदिवस मे १, २००३ ठरतो.

वसंतपंचमी लेखाचा इतिहास

अभय नातू १५:४२, ३१ जानेवारी २०११ (UTC)

जबरी!!! अभय, मनःपूर्वक धन्यवाद! :) मराठी विकिपीडिया या लेखात या महत्त्वपूर्ण संपादनाची नोंद केली आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१५, ३१ जानेवारी २०११ (UTC)
अभय, चांगली माहिती मिळवलीत,धन्यवादः) चला माझ विकिवरच माहितगार बिरूद तुमच्याकडे :) या माहिती मुळे किमान मराठी भाषा कशी असते हे माहित असून वसंतपंचमी लेखाची सुरवात करणार्‍या त्या अनामिक माणसाचे ऋण मान्य करावयास हवेतच.मराठी विकिची स्थापना होताना मराठी माणूस कुणी आसपास असावा असा अंदाजा बांधण्यास थोडी जागा उरते, त्या सदगृहस्थाने १ मे हि तारिख जाणीवपूर्वक निवडली का हा एका वेगळ्या संशोधनाचा भाग आहे माहितगार २२:०३, ३१ जानेवारी २०११ (UTC)

मुखपृष्ठ सदर

संपादन

मंडळी,

बर्‍याच महिन्यात मुखपृष्ठ सदर बदललेले नाही. सुचवलेल्या लेखांपैकी --

  • २०१० इंडियन प्रीमियर लीग - बरा वाटतो पण माझ्याशिवाय कोणाचाच पाठिंबा नाही म्हणून इतके दिवस तो पडून आहे.
  • संयुक्त महाराष्ट्र चळवळ - मराठी विकिपीडियाच्या दृष्टिने महत्वाचा आहे पण त्यात शुद्धलेखन, मांडणी व व्याकरणाचे बदल करावे लागतील.
  • हैदराबाद - आत्ताच पॅरिस हा शहरविषयक लेख सदर असल्याने तोचतोचपणा येईल असे वाटते.
  • मराठा साम्राज्य - मराठी विकिपीडियाच्या दृष्टिने महत्वाचा आहे पण त्यात शुद्धलेखन, मांडणी व व्याकरणाचे बदल करावे लागतील.
  • सुभाषचंद्र बोस - यात थोडेसे शुद्धलेखन, मांडणी व व्याकरणाचे बदल करावे लागतील. पण त्यातल्यात्यात हाच जास्त उजवा ठरतो. उद्या हा लेख सदर करावा म्हणतो. आक्षेप? सूचना? प्रश्न?

अभय नातू १९:०५, ३१ जानेवारी २०११ (UTC)