शाहरुख खान
शाहरुख खान

शाहरुख खान (Shah Rukh Khan; २ नोव्हेंबर, इ.स. १९६५, लोकप्रिय संक्षिप्त नाव: एस.आर.के.) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता व दूरचित्रवाणी प्रदर्शक आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो.

१९८०च्या दशकामध्ये फौजी, सर्कस इत्यादी लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये कामे करणाऱ्या शाहरूखने १९९२ सालच्या दीवाना ह्या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बाजीगर, डर इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्यानंतर त्याने १९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली छबी बदलली. त्यानंतर करण जोहरसोबत कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम इत्यादी यशस्वी चित्रपट त्याने दिले. पडद्यावरची त्याची व काजोलची जोडी लोकप्रिय आहे.

(पुढे वाचा...)