वाटूळ हे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गाव आहे.[१]

भौगोलिक स्थिती संपादन

हे गाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा बस स्थानकापासून १४ किमी अंतरावर वसलेले आहे. वाकेड घाट पार केल्यानंतर लगेचच वाटूळ बस थांबा लागतो. लांजा बस स्थानकातून राजापूर, झर्ये, पाचळ, खारेपाटणला जाणाऱ्या सर्व एसटी बसेस येथे थांबतात. तसेच राजापूर बस स्थानकातून लांजा, रत्‍नागिरी येथे जाणाऱ्या एसटी बसेस येथे थांबतात.

लोकजीवन संपादन

गावात मुख्यतः मराठा, कुणबी, वाणी, मुस्लिम, बौद्ध समाजातील लोक येथे पूर्वीपासून स्थायिक आहेत. भातशेती, नागलीशेती, तसेच शेतीपूरक जोडधंदे म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी पालन केले जाते. चव्हाण आडनाव असलेले लोक हे मूळचे वाटूळचे मानले जातात. येथील बरेचसे लोक नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झालेले आहेत. प्रत्येक वर्षी गणपती, होळी, शिमगा उत्सवांसाठी ते आवर्जून गावी येतात.

नागरी सुविधा संपादन

गावात पाणी पुरवठ्यासाठी विहीर, बोरिंग, ओहोळ ह्यांचा उपयोग केला जातो. येथे माध्यमिक शिक्षणापर्यंत सोय आहे. बाजारपेठ लांजा तसेच राजापूर येथे उपलब्ध आहे. येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[२] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

संदर्भ संपादन

  1. ^ "Map of District | District Ratnagiri, Government of Maharashtra | India" (इंग्रजी भाषेत). 2020-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ /https://www.bankofindia.co.in/

१. https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html

२. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

३. http://tourism.gov.in/