वाचिक अभिनय ही वाणी, बोलणे आणि शब्दोच्चारातून भावना व्यक्त करण्याची कला आहे. नाट्यवाचन, कथाकथन, आकाशवाणीवरून होणारी नभोनाट्ये ही वाचिक अभिनयाची काही उदाहरणे आहेत. शब्दाच्या केवळ उच्चारावरून पत्राची ओळख झाली पाहिजे, त्याचे वय, व्यवसाय, मानसिक अवस्था त्यातून प्रगट झाली पाहिजे अशी यात कल्पना असते.