वाघरी बोलीभाषा
वाघरी (किंवा वाघडी, बागरी) नावाच्या अनेक बोलीभाषा आहेत. प्रामुख्याने या आदिवासींच्या भाषा आहेत. वाघरी बोलीभाषा मराठी-गुजराती-राजस्थानी यांचे मिश्रण आहे. वाघरी लोकांचा व्यवसाय शिकार करणे, मासे पकडणे आणि जंगलातील उत्पादने गोळा करणे हा असतो.
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
विदर्भ (महाराष्ट्र) मधील काही तालुक्यात वसलेल्या टाकणकार समाजाच्या बोली भाषेसही वाघरी म्हणजेच वाघारामी बोली म्हणतात.या बोली भाषेवर राजस्थानी व गुजराती भाषांची छाप आहे.[ संदर्भ हवा ]
"शिकार वाघऱ्हांची" :-
शिकारीच्या वाघूळला मयटे म्हणतात, मासे पकडण्याच्या जाळ्याला जायू म्हनतात, "ससा" वाघरीमधे (दात्ती)च्या मयठ्याला लावलेल्या काळ्याना मराणी म्हणतात, (दात्ती)च्या मटणाच्या भागाला वेगवेगळी नावे आहेत. मुंडक्याला फासरू म्हणतात; कलेजी (लिव्हर-जठर)ला परमोरी म्हणतात; पायाच्या पंज्याना गोळो म्हणतात. हरिणाच्या जातीला वाघरी भाषेतील नावे : हरणाच्या मादीला बोळी, चिंकाऱ्याला काईट म्हणतात; तितर, बाटी पकडण्याला फांज, झापूल म्हणतात,
वाघरी वाक्यांची उदाहरणे
संपादनवाघरी वाक्य | मराठी अर्थ | |
---|---|---|
म्हारी बोली वाघरी बोली | माझी भाषा वाघरी | |
घना मोठा पावना आया मारां घरं | खूप पाहुणे आले माझ्या घरी | |
बजारती सामान सुमान लावू लागसं आम्ना. | बाजारातून सामान सुमान आणावे लागेल आज | |
बानं पुसीन कपडा लत्ता लावू लागसं | बाबांना विचारून कपडे आणावे लागतील | |
सहो बा मोठा आईनू माहेर क्यानू होतू | अहो बाबा, मोठ्या आईचे माहेर कुठे होते? | |
ते कये आपला घरं आवताबी नयी | ते कधी आपल्या घरी येत नाहीत. | |
न्हानी आयीना भाई बी आवता नयी | काकूचे भाऊ पण येत नाहीत | |
मी तिनो भत्रीजो अश्यापर मालूम नयी मनं | मी तिचा पुतण्या असूनही मला माहीत नाही | |
मारो मामो तिवनां घरं जातोरसं | माझे मामा त्यांच्या घरी जात असतात | |
पावनो बी तिवना घरं जातोरसं | पाहुणेही त्यांच्या घरी जात असतात | |
ते आपला घर आवता नयी | ते आपल्या घरी येत नाहीत. | |
पावना आया की तिवनं पुसीसं | पाहुणे आले की त्यांना विचारीन | |
आमरा घरं समुनही आवता | आमच्या घरी का नाही येत | |
आमहि तुम्हारा घरं आवनारा नही | आम्हीपण तुमच्या घरी येणार नाही | |
हाम्ना इव्व जावू लागसं बाईना घरं | आता बाईच्या घरी लग्नाला जावे लागेल . | |
आख्खाना आख्खा जासू बाईनात्या | सगळेच्या सगळे जाऊ या बाईंच्या घरी | |
बाईनां देवरनां. | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण | |
उदाहरण | उदाहरण |