वांग खान हा मंगोलियाच्या प्रमुख आणि शक्तिमान टोळ्यांपैकी किरेयीड या एका महत्त्वाच्या टोळीचा टोळीप्रमुख होता. चंगीझ खानाच्या वडिलांशी त्याची घनिष्ट मैत्री होती व त्याने चंगीझला वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या टोळीत घेऊन मदत केली. चंगीझच्या मदतीने त्याने अनेक लढाया एकत्र लढून आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

पुढे चंगीझ आपल्याला डोईजड होतो आहे असे वाटल्याने त्याने विश्वासघाताने चंगीझचा काटा काढायचे ठरवले. याप्रकाराचा सुगावा लागताच चंगीझने वांग खानाच्या टोळीवर हल्ला केला व त्याला परागंदा होण्यास भाग पाडले. त्याच अवस्थेत वांग खानाचा मृत्यू झाला.