वसू भगत
वसू भगत ( - मृत्यू: ६ मे, इ.स. २०१०) हे मराठी नाटककार व लेखक होते. भगतांचे मूळ गाव नागपूर. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. तिथून त्यांनी दिग्दर्शन व चित्रपटलेखन या विषयात डिप्लोमा मिळवला. फिल्म इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचे ते गोल्ड मेडॅलिस्ट होते.[१] वसू भगतांनी लिहिलेल्या 'जंगली कबुतर' या कमलाकर सारंग दिग्दर्शित नाटकाचे नटेश्वर या संस्थेने दोन हजाराहून अधिक प्रयोग केले.
लेखन
संपादनभगतांनी 'माणूस' साप्ताहिकातून बरेच लेखन केले. त्यांनी चित्रपटविषयक लेखनही केले. त्यांनी एकूण नऊ नाटके लिहिली. त्यातील 'वासवदत्ता', 'नियती', 'मृत्यूछाया' या नाटकांना पारितोषिके मिळाली. 'प्रकाशाची झाडे' या त्यांनी लिहिलेल्या लघुकथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कारही मिळाला. त्यांनी लिहिलेले 'जंगली कबुतर' हे नाटक मराठीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही गाजले. त्यावर हिंदी चित्रपटही निर्माण झाला.
निधन
संपादनवसू भगत यांचे मालाड येथील रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ६ मे, इ.स. २०१० यादिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ म. टा. सांस्कृतिक प्रतिनिधी (७ मे २०१०). "नाटककार वसू भगत यांचे निधन". महाराष्ट्र टाईम्स. 2016-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ मार्च २०१४ रोजी पाहिले.