वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

(वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. वसंत वऱ्हाडपांडे (१९ डिसेंबर १९२७) हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आणि भाषाभ्यासक होते. ते एम्.ए. पीएच्.डी. होते व नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये प्राध्यापक व मराठी विभागाचे प्रमुख होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते काही काळ संपादक होते. वऱ्हाडपांडे यांनी ’गरुडझेप’ नावाचा सावरकर गौरवग्रंथ संपादित केला होता. तो नागपूरच्या विजय प्रकाशनने, १९८३मध्ये प्रकाशित केला.

मराठी विश्वकोशाचे ते एक लेखक होते. त्या विश्वकोशातील पु.भा. भावे यांच्यावरचा लेख वऱ्हाडपांडे यांनी लिहिला आहे.


वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • गरुडझेप (संपादित)
  • चित्रशाळा (कादंबरी)
  • नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास (ग्रंथ)
  • या मनाचा पाळणा (कवितासंग्रह)
  • वसंत वैभव
  • वास्तु व उत्सव (कथासंग्रह)

पुरस्कार संपादन

डॉ. व.कृ. वऱ्हाडपांडे याच्या स्मरणार्थ विदर्भ साहित्य संघ ‘वसंतराव वऱ्हाडपांडे स्मृती पारितोषिक’ देतो. हा पुरस्कार एका वर्षी श्रीधर शनवारे यांना त्यांच्या ’तळे संध्याकाळचे’ला मिळाला होता.