वर्तक बाग हा पुणे शहरातील एक बगीचा आहे. ही वर्तक बाग शनिवार पेठेतल्या ओंकारेश्वर मंदिराच्या मागे आहे. पेशव्यांनी इ.स. १७३८मध्ये ओंकारेश्वर मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आणि कालांतराने देवळाला लागणाऱ्या फुलांसाठी बागेची जागा नेमून दिली. तयार झालेल्या या बागेचे क्षेत्रफळ चार एकर होते. बागेत फुलांखेरीज वांगी आदी भाज्या लावल्या होत्या. कडुनिंबाची आणि पेरूची झाडेसुद्धा लावली होती.

या ओंकारेश्वराच्या बागेमध्ये एक भुडकी (नदीच्या काठापाशी बांधलेली विहीर) होती. शनिवार पेठेतल्या वर्तक बागेत या भुडकीचे अवशेष पहायला मिळतात. भुडकीत बहुधा पाणी आणून टाकावे लागते.

दुसरी वर्तक बाग

संपादन

पुण्यात म्हात्रे पुलाजवळ राजा मंत्री रोड (/100 Ft. D.P. रोड) मध्ये आणि आजूबाजूला आणखी एक वर्तक बाग आहे. The Senate Business Center, वर्तक हेरिटेज, वर्तक प्राईड, शुभारंभ लॉन्स, संजीवनी ग्रुपचे कार्यालय, वर्तक बाग फाटाका असोसिएशन इत्यादीसारख्या त्या भागातील अनेक प्रमुख आस्थापना त्यांच्या पत्त्यात वर्तक बाग यांचा उल्लेख करतात.