वर्ग चर्चा:भौतिकशास्त्र

वर्गीकरणाची पद्धत ही प्रमुख्याने इंग्रजीतील पोर्टलच्या पानावरील ढोबळ विभागणीनुसार आहे. येथे अभिजात व आधुनिक असे भौतिकशास्त्राचे दोन विभाग केले आहेत. साधारणपणे रुदरफोर्डच्या अणु प्रतिकृतीपासून पुढे निर्माण झालेल्या शाखांचा समावेश आधुनिक भौतिकशास्त्रात होतो. त्यापूर्वीचे सर्व अभिजात भौतिकशास्त्रात येते. याशिवाय beginnersची सोय म्हणून मूलभूत संकल्पना ह विभाग स्वतंत्र ठेवला आहे. हा वेगळा ठेवण्याचा दुसरा उद्देश असा की यातील बहुतांश संकल्पना आधुनिक भौतिकशास्त्रातही तितक्याच लागू आहेत. याशिवाय Cross Discipline Topics चा एक उपवर्ग होता. तो पुन्हा घातल्यास बरे होइल. सध्या या भौतिकी व इतर शास्त्रांच्या interface वरील विषयांतही बरेच संशोधन सुरु आहे. मात्र त्याचा अभिजात किंवा आधुनिक भौतिकीत by convention समावेश करता येत नाही. म्हणून हा विभाग वेगळा असावा.

याव्यतिरिक्त यामिक हा भौतिकशास्त्राचा स्वतंत्र उपवर्ग केलेला दिसतो आहे. याची आवश्यकता नाही कारणः १) वरील paragraph मध्ये वर्णिलेल्या वर्गीकरणात (जे सध्य भौतिकीत रूढ आहे) हे बसत नाही २) अभिजात व पुंज यामिक हे दोन स्वतंत्र व advanced topic असल्याने ह्यांचा वाचक त्या त्या विभागांतच ते वाचणे पसंत करेल.

तेव्हा माझे मत आहे की यामिक हा स्वतंत्र उपवर्ग नसावा.

अनिकेत जोगळेकर १५:४८, २८ जुलै २०१० (UTC)

Start a discussion about वर्ग:भौतिकशास्त्र

Start a discussion
"भौतिकशास्त्र" पानाकडे परत चला.