वर्ग चर्चा:भारतीय संसदीय कार्यमंत्री

शीर्षक संपादन

मला वाटते कि हे नाव वर्ग चर्चा:भारतीय सांसदीय कार्यमंत्री असे हवे. वि. नरसीकर (चर्चा) १४:३९, ८ डिसेंबर २००९ (UTC)

'Minister of Parliamentary Affairs' या संदर्भाने ही शब्दयोजना अभिप्रेत आहे. 'संसदेशी संबंधित' अशा अर्थाने 'संसदीय' असा शब्द बनतो (पार्लमेंटरी या शब्दाचाच समानार्थी शब्द). शासकीय हिंदीत 'सांसद' हा शब्द संसदसदस्यांसाठी वापरतात. त्यामुळे 'सांसदीय' या शब्दाचा अर्थ 'संसदसदस्यांशी संबंधित' असा होईल; मात्र तसा अर्थ या शीर्षकात अभिप्रेत नसल्याने माझ्या मते 'संसदीय' हा शब्दच योग्य ठरतो.
माझी शंका 'कार्यमंत्री' या शब्दाबद्दल आहे. मी 'कामकाज-मंत्री' असा शब्द ऐकल्याचे/वाचल्याचे स्मरते. Affairs या अर्थाने ते चपखलही वाटते.
अर्थात, या संदर्भात मराठीत शासकीय परिभाषा काय योजली जाते, हे कुठे सापडल्यास उत्तम!
--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:३३, ९ डिसेंबर २००९ (UTC)


उत्तर पटले व सहमत.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२८, १४ डिसेंबर २००९ (UTC)

"भारतीय संसदीय कार्यमंत्री" पानाकडे परत चला.