वर्ग चर्चा:आश्विन महिना
आश्विन का अश्विन??
संपादनअश्विन हा बरोबर शब्द आहे.
हा वर्ग काढून टाकला जावा व त्यातील लेख पुनर्निर्देशित करावे.
आपली मते कृपया इथे नोंदवा.
padalkar.kshitij २१:१६, १३ नोव्हेंबर २००८ (UTC)
अश्विन बरोबर आहे
संपादनअश्विन बरोबर आहे असे मला वाटते, तसेच हा 'वर्ग' ही चूकीचा आहे. भारतीय सौर दिनदर्शिकेचे महिने अथवा भारतीय महिने असा वर्ग योग्य रहावा असे वाटते. तसेच या महिन्यात येणार्या विशेष दिवसांची माहितीही इथे यावे असे वाटते.
आश्विनच बरोबर आहे
संपादनभारतीय महिने चांद्र पद्धतीनुसार, म्हणजेच चंद्राच्या गतीनुसार ठरतात. आपल्याकडे महिन्यांची नावे त्या त्या महिन्यात चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात असेल् त्यावरून पडतात. चंद्र पौर्णिमेला चित्रेत असतो तेव्हा चैत्र महिना, पौर्णिमेला विशाखेत असतो तेव्हा वैशाख वगैरे. चंद्र अश्विनी नक्षत्रात असतो तेव्हा 'आश्विन' महिना असतो. 'अश्विनी' या ईकारान्त स्त्रीलिंगी नावावरून व्युत्पन्न नाम 'आश्विन' असे होते. 'अश्विन' हे लेखन अशुद्ध आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा) १६:२४, १५ नोव्हेंबर २००८ (UTC)