वर्ग:संस्कृतीनुसार आडनावे
हिंदू परंपरेत वैदिक कालापासून विविध उपनामे म्हणजे आडनावे रूढ झालेली दिसतात. उपनिषदात गार्गी वाचक्नवी या विदुषीचा उल्लेख होतो. गार्गी तिचे नाव आणि वचक्नूची मुलगी म्हणून वाचक्नवी. दोन वेद संहितांचे अध्ययन केलेली व्यक्ती द्विवेदी, तीन संहिता ज्याने अभ्यासल्या ते त्रिवेदी, चार संहिता ज्याने अभ्यासल्या ते चतुर्वेदी अशी आडनावे प्रचलित आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी अनेक वाजपेय यज्ञ केले त्यांचे आडनाव वाजपेयी असते.