वर्गमूळ () ही वर्गक्रियेच्याविरुद्ध असलेली गणितीय प्रक्रिया होय. ज्या संख्येचा स्वतःशीच गुणाकार केला असता उत्तर क्ष येते, ती संख्या क्षचे वर्गमूळ होय. उदा. ४ गुणिले ४ बरोबर १६. म्हणून ४ ही संख्या १६ चे वर्गमूळ आहे. वर्गमूल हे धन आणि त्याचवेळी ऋणही असते. त्यामुळे -४ (उणे चार) हेही १६ चे वर्गमूळ आहे.

पूर्ण वर्ग असलेल्या संख्येचे वर्गमूळ त्या संख्येचे अवयव पाडून काढतात. उदा० १४४ चे अवयव २, २, २, २, ३, ३. दोनदा आलेले अवयव एकदाच मोजले की २,२, ३. यांचा गुणाकार १२. म्हणून १४४ चे वर्गमूळ १२.
वर्गमूळ
१६
२५
३६
४९
६४
८१
१०० १०
१२१ ११
१४४ १२
१६९ १३
१९६ १४
२२५ १५
२५६ १६
२८९ १७
३२४ १८
३६१ १९
४०० २०