वरोरा विधानसभा मतदारसंघ

वरोरा विधानसभा मतदारसंघ - ७५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वरोरा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती या तालुक्यांचा समावेश होतो. वरोरा हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिभा सुरेश धानोरकर हे वरोरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

वरोरा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • वरोरा तालुका
  • भद्रावती तालुका

वरोरा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ महादेव नागोराव पावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ ते २००९ : भद्रावती विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९५७ ते २००९ : भद्रावती विधानसभा मतदारसंघ
२००९ संजय वामनराव देवतळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुरेश नारायण धानोरकर शिवसेना
२०१९ प्रतिभा सुरेश धानोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).