लघुतम साधारण विभाज्य

(ल. सा. वि. या पानावरून पुनर्निर्देशित)

दोन धन पूर्णांक संख्यांचा लघुतम साधारण विभाज्य (ल.सा.वी.) म्हणजे दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या.

उदाहरण

संपादन

२२ आणि ४चा ल.सा.वी. ४४ आहे. कारण ४४ला २२ ने भाग जातो, तसेच ४ ने ही भाग जातो. २२ ने भाग जाणारी संख्या २२ च्या पटीतली संख्या असायला हवी, २२ला ४ ने भाग जात नाही, पण ४४ला ४ ने भाग जातो. म्हणून ४४ हा ४ आणि २२चा लघुतम साधारण विभाज्य आहे.

१५ आणि २०चा ल.सा.वी. १५, ३०, ४५, ६० मधील २० ने भाग जाणारी पहिली संख्या ६० हा आहे. ल.सा.वी. काढायची ही एक पद्धत आहे. मोठ्या संख्यांसाठी ही पद्धत वापरणे कठीण होते.

अवयव पद्धत

संपादन

ज्या संख्यांचा ल.सा.वी. काढायचा त्या संख्यांचे मूळ अवयव काढा.

२२ = २ X ११ , ४ = २ X २. दोन्ही संख्यांच्या अवयवात २२ मध्ये २ एकदा आणि ११ एकदा आला आहे. ४ मध्ये २ दोनदा आला आहे. कोणत्याही एका संख्येत जास्तीत जास्त जितक्या वेळेला मूळ संख्या आलेली असेल ती तितक्यांदा ल.सा.वी.च्या अवयवात येते.

२२ आणि ४चा ल.सा.वी. = २ X २ X ११ = ४४

हे सुद्धा पहा

संपादन