ल.वि. आगाशे
डॉ. लक्ष्मण विनायक आगाशे (इ.स. १९१६ - ??) हे भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ होते. भारतातील दख्खनच्या पठारावरच्या डेक्कन ट्रॅप या लाव्हा रसातून बनलेल्या विशाल क्षेत्रावर त्यांनी संशोधन केले. पुणे इंजिनिअरिंग कॉलेजात ते ११ वर्षे भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा, वैतरणा तलाव, वसई खाडीखालील कशेळीचा बोगदा, कोयनेचा तिसरा टप्पा, मुळानगरचे धरण अशा अनेक प्रकल्पांवर आगाशे यांनी भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून काम केले.
पुरस्कार
संपादनआगाशे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार देण्याचे सुरू करण्यात आले आहे. २०१६ साली हा पुरस्कार पहिल्यांदा सेंटर फॉर सिटिझन सायन्स या पुण्यातील संस्थेस प्रदान झाला.