लोलिता
"लोलिता", ही 'रशियन-अमेरिकन' कादंबरीकार व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह (रशियन: Влади́мир Влади́мирович Набо́ков) (साचा:IPA-ru) यांनी लिहिलेली, कादंबरी आहे. १९५८ साली प्रकाशित झालेली ’लोलिता’ ही नाबोकोव्हची सर्वात प्रसिद्ध साहित्यकृती आहे. ’माँडर्न लायब्ररी’त उल्लेख केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये लोलिता ही चौथ्या क्रमांकावर होती. वर्णनाचे बारकावे आणि शैलीदारपणा ही नाबोकोव्हच्या कामाची खासियत या कादंबरीत दिसून येते. 'निंफेट' (अल्पवयीन मादक सौंदर्यवती) (इंग्रजी: Nymphet) हा शब्द नाबोकोव्हच्या लोलिता कादंबरीने इंग्रजी भाषेत आणला.
कथा
संपादनहम्बर्ट हा एक मध्यमवयीन युरोपीय घटस्फोटित गृहस्थ अमेरिकेत जातो. तिथे तो एका ठिकाणी भाड्याने राहातो. त्याच घरात डलोरिस हेज आणि आणि तिची विधवा आई राहत असते. हम्बर्टचे डलोरिसवर प्रेम बसते पण त्याला तिच्या आईला कसे दूर करावे ह्या विचारात तो असतो. पुढे तो तिच्या आईशी लग्न करतो आणि कथा अनेक वेगवेगळी वळणे घेते.