लोकसाहित्य संमेलन
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
लोकसाहित्य संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन पुण्यात १ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. हे संमेलन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे असतील.
ठाण्याचा लोकरंग सांस्कृतिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) आणि बावधन(पुणे)चे राष्ट्रसेवा प्रतिष्ठान या संमेलनाचे प्रायोजक असतील.