लॉर्ड बुद्धा टीव्ही

लॉर्ड बुद्धा टीव्ही ही हिंदीतील व मराठीतील आंतरजालावरून प्रक्षेपित होणारी दूरचित्रवाणीवाहिनी आहे. या वाहिनीचे प्रमुख भैय्यासाहेब खैरकर हे असून या वाहिनीची सुरुवात २५ डिसेंबर २००९ रोजी झाली. या वाहिनीचे प्रमुख कार्यालय दीक्षाभूमी, नागपूर येथे आहे.[१] गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भारतीय सर्व बहुजन महापुरूषांचे विचार भारतभर पोहोचवण्याचे काम ही वाहिनी करत असते.

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "वाहिनीचे संकेतस्थळ". Archived from the original on 2014-12-17. २०१४-१२-१० रोजी पाहिले.