लॉकरबी स्कॉटलंडच्या डम्फ्रीस अँड गॅलोवे भागातील छोटे शहर आहे. ग्लासगोपासून १२१ किमी अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २००१च्या जनगणनेनुसार ४,००९ होती. १९८८मध्ये दहशतवाद्यांनी पॅन ॲम फ्लाइट १०३वर बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर त्या बोईंग ७४७ विमानाचे तुकडे या शहरावर पडले होते.