लीना मोहन माटे (माहेच्या वीरकर) या एक मराठी कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव मुकुंद आत्माराम वीरकर आणि आईचे नाव शालिनी वीरकर आहे. या मुंबईतील पार्ल्याला असून २०१५-१६ या वर्षांत अमेरिकेत राहत होत्या. |पार्ल्यात वास्तव्य असलेल्या लेखिका चारुशीला ओक आणि माधवी कुंटे यांच्या प्रोत्साहनामुळे लीना माटे कथा लिहू लागल्या. या दोघींनी एक साहित्य चळचळ म्हणून |पार्ल्यात सुरू केलेल्या कथाक्लबच्या त्या सदस्य झाल्या. त्यांव्या कथा व लेख वृत्तपत्रांतून आणि दिवाळी अंकांतून छापून येऊ लागल्या. कथास्पर्धांसाठी पाठविलेल्या काही कथांना बक्षिसे मिळाली. लीना माटे यांना त्यांचे काही लेख आकाशवाणीवरील 'अस्मिता वाहिनी'च्या 'ऐसी अक्षरे' या कार्यक्रमात वाचून दाखवायची संधी मिळाली.

पुस्तके

संपादन
  • चिऊची सफर (बालगीतांचा संग्रह)
  • पिंपळ पान (ललित लेखसंग्रह)
  • विखुरलेल्या चांदण्या (कवितासंग्रह)