लिबर्दादे (साओ पाउलो)

लिबर्दादे (पोर्तुगीज: Liberdade - リベルダーデ) हे ब्राझिलच्या साओ पाउलो शहराचे एक उपनगर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,८६० होती. येथील बहुतांश लोक जपानी वंशाचे आहेत.

लिबर्दादे

या भागाला पूर्वी काम्पो दा फोर्का (फाशीचे मैदान) असे नाव होते. येथे गुलाम व गुन्हेगारांना मृत्युदंड दिला जात असे.