लेखन त्रुटी:"infoboxTemplate" ही क्रिया अस्तित्वात नाही. लिन डॅन (१४ ऑक्टोबर, १९८३ - ) हा चीनचा माजी व्यावसायिक बॅडमिंटन खेळाडू आहे. तो दोन वेळचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता, पाच वेळा विश्वविजेता, तसेच सहा वेळचा ऑल इंग्लंड चॅम्पियन आहे.

{{{playername}}}

गोल्डन बौहिनिया स्क्वेअर, हाँगकाँग, २००८
वैयक्तिक माहिती
उपाख्य सुपर डॅन
जन्म नाव लिन डॅन
जन्म दिनांक १४ ऑक्टोबर १९८३ (वय ३६)

लोंग्यान, फुजिआन, चीन

उंची १७८ सेंमी (५ फूट १० इंच)
वजन 70 किलोग्रॅम
देश चीन
कार्यकाळ २०००-२०२०
हात डावखुरा
प्रशिक्षक झिया झुआंझ
पुरुष एकेरी
सर्वोत्तम मानांकन १ (१ (२६ फेब्रुवारी २००४))
विजेतेपद ६६
बी ड्ब्लु एफ

तो जगातला एक महान बॅडमिंटनपटू आहे.[१] [२] [३] : वयाच्या 28 व्या वर्षी त्याने "सुपर ग्रॅंड स्लॅम" पूर्ण केला. बॅडमिंटन जगातील सर्व महत्त्वाची विजेतीपदे त्याने जिंकली. ऑलिंपिक, जागतिक चॅम्पियनशिप, विश्वकरंडक, थॉमस कप, सुदिरामन कप, सुपर सिरीज मास्टर्स फायनल्स, ऑल इंग्लंड ओपन, एशियन गेम्स, आणि एशियन चॅम्पियनशिप या सर्व स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. अशी कामगिरी गाठणारा तो जगातला पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला. [४] [५] २००८ मध्ये ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकल्यानंतर सलग दुसऱ्यांदा २०१२ मध्ये पुन्हा ऑलिम्पिक सुवर्णपदक कायम राखणारा तो पुरुष एकेरीतला पहिलाच खेळाडू ठरला. [६] २०१७ मध्ये मलेशियन ओपन जिंकणे बॅडमिंटन जगातील प्रत्येक मोठे जेतेपद मिळवण्याच्या लिनच्या यशाचे चिन्ह होते. [७]

२००४ मध्ये ऑल इंग्लंड ओपन फायनल जिंकली. या स्पर्धेत त्याने प्रतिस्पर्धी पीटर गेड याचे आव्हान मोडीत काढल्यानंतर चाहत्यांनी, तसेच प्रसारमाध्यमांनी त्याला "सुपर डॅन" असे संबोधले. त्याच्या यशाची ही पावती होती. [८] [९]

बॅडमिंटन कारकीर्द संपादन

२००० च्या बॅडमिंटन आशिया ज्युनिअर चँपियनशिपमध्ये आणि एकेरीत दोन्ही स्पर्धांमध्ये लिनने विजेतेपद पटकावले. २००० वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये तो विजेत्या चिनी संघाचा सदस्य आणि एकेरीतला उपांत्य फेरीचा खेळाडू होता. [१०]

वैयक्तिक माहिती संपादन

लिनचा जन्म फुजिआनमधील लोंग्योन येथे हक्का कुटुंबात झाला. बालपणी लिनला त्याच्या पालकांनी पियानो शिकविण्यास पाठविले. पुढे तो मोठा पियानोवादक व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, लिनला त्याची आवड नव्हती. मित्र बॅडमिंटन खेळताना त्याने पाहिले आणि पाहताक्षणी हा खेळ त्याला आवडला. वयाच्या पाचव्या वर्षी त्याने बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. [११]

संदर्भ आणि नोंदी संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ AFP. "Lin Dan the greatest, says record-breaking Gade". NDTV. Archived from the original on 27 December 2014. 6 March 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Is Lin Dan the greatest ever?". Daily News and Analysis. 24 October 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Lin Dan wins sixth All England title". Times of India. 13 March 2016.
  4. ^ "史上最佳"送林丹绝不是奉承 超级大满贯前无古人. Sina (Chinese भाषेत). 21 November 2010. 2 February 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ ""Super Dan" completes super "Grand Slam" as Denmark denies China's clean-sweep at BWF Finals". Xinhuanet. 18 December 2011. Archived from the original on 19 November 2013. 19 December 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "London 2012 Badminton: Lin Dan beats Lee Chong Wei to win Gold". NDTV. 5 August 2012. Archived from the original on 7 August 2012. 5 August 2012 रोजी पाहिले.
  7. ^ "Lin Dan crowned Malaysia Open Superseries badminton champ, Carolina Marin loses". Times of India. 28 April 2017.
  8. ^ "林丹:不喜欢超级丹称号 会选择留在潘多拉星球". enorth.com.cn (Chinese भाषेत). 5 March 2010. 2 February 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ 直到世界尽头 (Chinese भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "林丹". data.sports.163.com. Archived from the original on 30 June 2011. 18 March 2011 रोजी पाहिले.
  11. ^ "सुपर डॅनची निवृत्ती..." kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-07-09. 2020-07-14 रोजी पाहिले.