लिकुड हा इस्रायल देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. धर्मनिरपेक्ष असलेला लिकुड पक्ष आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे इस्रायली राजकारणात उजवीकडे झुकणारा पक्ष मानला जातो. लिकुडची स्थापना १९७३ साली मिळत्याजुळत्या विचारधारा असलेल्या अनेक राजकीय पक्षांच्या एकत्रीकरणातून झाली. १९७७ सालच्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये लिकुडला मोठे यश मिळाले व इस्रायलच्या इतिहासात प्रथमच उजव्या विचारांचा पक्ष सत्तेवर आला.

लिकुड
הליכוד
नेता बिन्यामिन नेतान्याहू
संस्थापक मेनाकेम बेगिन, यित्झाक शामिर
स्थापना १९७३
मुख्यालय तेल अवीव
सदस्य संख्या १.२५ लाख
राजकीय तत्त्वे राष्ट्रीय उदारमतवाद
ज्यूवाद
रंग   निळा
क्नेसेट सदस्य
३० / १२०
www.likud.org.il

इस्रायलचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रेउव्हेन रिव्हलिन व पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू लिकुडचेच सदस्य आहेत.

आजवरचे पक्षाध्यक्ष संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत