लाल रानकोंबडा
लाल रानकोंबडा (इंग्लिश: Indian Red Junglefowl) हा एक पक्षी आहे.
ओळख
संपादनआकाराने गावकोंबडीएवढा.नर व मादीच्या रंगात फरक.मादी उदी रंगाची.त्यावर काड्या.खालून तांबूस उदी.पाळीव बॅटमप्रमाणे ह्या पक्षाचे नर व मादी असतात.जोडीने किंवा समूहाने आढळून येतात. कोकणात डोंगरेन कोंबा,सीम म्हणतात.गोंदियात गेरा गोगूर,कुरु,रेंगाल गोगड,रेंगाल गोगल(भंडारा),गेडा कोक परदा कोभरी(माडिया-गडचिरोली)म्हणतात.हिंदीमध्ये जंगली मुर्ग,जंगली मुर्गा,जंगली मुर्गी,बनमुर्ग,बनमुर्गा,बनमुर्गी,भुरी जंगली मुर्गी,लाल मुर्ग,लाल मुर्गी म्हणतात.संस्कृतमध्ये कृकवाकु,प्रख्यात रक्त वनकुक्कुट,वन कुक्कुट म्हणतात.तेल्गुम्ध्ये येर्र अडवि कोडि,यर्रानि,अडवि कोडि म्हणतात.
वितरण
संपादननिवासी.हिमालयाच्या पायथ्यापासून पाकिस्तान,भूतान आणि अरुणाचल प्रदेश,बांगला देश,ब्रह्मपुत्रेकडील प्रांत,पश्चिम बंगाल,बिहार,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ते पश्चिम सातपुडा,पश्चिम घाट(खंडाळा).अंदाजे गोदावरी नदीकाठ ते मुखापर्यंत.
निवासस्थाने
संपादनपानगळीची आणि सालाच्या झाडांची दमट जंगले;तसेच शेतीचा भाग विखुरलेली झुडपी जंगले.हिमालयात २००० मीटर उंचीपर्यंत.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली