लाल बिहारी उर्फ लाल बिहारी मृतक हे उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील अमिलो गावचे शेतकरी व सामजिक कार्यकर्ते आहेत. आधिक्रुत सरकार दरबारातील कागदोपत्री ते इ.स. १९७५ ते इ.स. १९९४ या काळात मृत होते. त्यांनी १९ वर्षे स्वतः जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी भारतीय बाबुशाही विरुद्ध लढा दिला. हा लढा सुरू असताना त्यांच्या नावात मृतक हा शब्द जोडला गेला व त्यांनी "उत्तर प्रदेश मृतक संघ" या नावाने मृतक शेरा असलेल्या पण जिवंत लोकांच्या मदतीसाठी संस्था स्थापन केली.[१]

इ.स. १९७५ साली बॅकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक रहिवासी दाखला मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात ते गेले असता त्यांना ते आधिक्रुत रित्या मृत असल्याचे सांगण्यात आले. वडलोपर्जित असलेली शेती की जी १ एकरा पेक्षाही कमी आहे ती बळकावण्यासाठी त्यांच्या काकांनी सरकारी अधिकाऱ्याना लाच देउन लाल बिहारींचे नाव कमी करून घेतले होते. इ.स. १९८९ सली ते स्वतः जिवंत आहेत हे सिद्द करण्यासाठी त्यांनी राजीव गांधी यांच्या विरुद्ध निवडणुकही लढविली, परंतु ते निवडणुक हारले. शेवटी १९ वर्षे कायदेशीर लठा दिल्यानंतर त्यांना १९९४ साली न्याय मिळाला व ते आधिक्रुत रित्या जिवंत असल्याचे जाहीर झाले.[२]

लाल बिहारींनी अधिक शोध घेतल्यावर त्यांना आणखी १०० मृतक शेरा असलेल्या पण जिवंत लोकांबद्दल माहिती मिळाली. त्या लोकांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेश मृतक संघाची स्थापना केली. त्यांच्यासह मृतक संघाच्या इतर कार्यकर्त्याना धमवकण्यात आले. या मृतक संघाचे भारतभर २०,००० सभासद आहेत. २००४ साला पर्यत संघाला ४ लोकांचा मृतक शेरा रद्द करण्यात यश आले आहे.

२००३ साली लाल बिहारींना अमेरिकेतिल आयजी. नोबेल हा अत्यंत मानाचा पुरस्कार जाहीर झाला.[३]

संदर्भ संपादन

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-08-25. 2013-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ [१]
  3. ^ [२]