लाल डोक्याचा ससाणा, आकोस, आडेरा, मोरगी किंवा तुरमती (इंग्लिश: Red-headed falcon, Red-headed merlin; हिंदी: तुरुमती, तुरुमतरी, तुरुमतु; गुजराती: तुरमती, चटवा; तेलुगू:जेल्ल गट, जेल्ल गद्द, तिरूमुंडि डेग) हा एक शिकारी पक्षी आहे.

लाल डोक्याचा ससाणा
लाल डोक्याचा ससाणा

हा आकाराने अंदाजे कबुतराएवढा सुबक सुंदर ससाणा असतो. वर निळसर करडा, खाली पांढरा असतो. पोट व पंखांवर काळवट, दाट पट्टे व काड्या असतात. त्यांच्या पंखांची पांढरी किनार आणि वरचे रुंद काळे पट्टे उडताना ठळक दिसतात. डोके काळसर तांबूस असते. नर-मादी दिसायला सारखे असतात. मादी नरापेक्षा मोठी असते. नेहमी जोडीने राहतात.

वितरण

संपादन

निवासी व अंशतः स्थलांतर करणारे. पूर्वेकडे आसाम आणि बांगला देश, तसेच भारतीय द्वीपकल्पात आढळतात. जानेवारी ते मार्च हा त्यांच्या वीणीचा काळ आहे.

निवासस्थाने

संपादन

हे पक्षी माळराने, राया आणि भातशेती, तसेच विरळ जंगले येथे असतात.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली