लाल डोक्याचा भारीट किंवा लाल डोक्याचा रेडवा (इंग्रजी: Red-headed Bunting; हिंदी: गन्दम) हा एम्बेरिझिडे या भारीट कुळातील पक्षी आहे.

लाल डोक्याची रेडवा

ओळखण संपादन

हा सडपातळ रान चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. याची लांब शेपटी दुभागलेली असते. नराचा खालचा भाग पिवळा, वरचा भाग हिरवा आणि तोंड व छाती लाल रंगाचे असते. मादीचा रंग वरून राखी आणि पाठीमागचा वर्ण पिवळा असतो. पिसाचा रंग गव्हाळी असून त्यावर पिवळी झाक असते.

वितरण संपादन

हे पक्षी भारतीय द्वीपकल्प व भारतीय उपखंडाचा भाग आणि पाकिस्तानात हिवाळी पाहुणे असतात. त्याचबरोबर पूर्वेकडे कोईम्बतूरपर्यंतछोटा नागपूरमध्ये आढळतात.

निवासस्थाने संपादन

ते शेतीच्या प्रदेशात राहतात.

संदर्भ संपादन

पक्षीकोश - मारुती चितमपल्ली