लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली लालबाग मधील मानाच्या मंडळांपैकी एक आहे. हा मुंबईचा राजा या नावाने प्रसिद्ध आहे. इ.स. १९२८ मध्ये मंडळाची स्थापना झाली असून मंडळाचे हे ८९ वे वर्ष आहे. सन १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात देशातील सर्वात पहिली २२ फूट उंच मूर्ती बनवली आणि लालबागचं नाव जगभरात पोहचवले. नवसाचा गणपती म्हणूनही त्यालाओळखले जाते.

गणेशोत्सव

संपादन

मुंबईतील मानाच्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक मंडळ असून "मुंबईचा राजा" या नावाने प्रसिद्ध आहे. सन १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात देशातील सर्वात पहिली २२ फूट उंच मूर्ती बनवली आणि लालबागचं नाव जगभरात पोहचवले. त्यानंतर सन २००२ मध्ये अमृत महोत्सवी वर्षात भव्य आणि नेत्रदीपक अशा सजावटीवर भर देऊन मदुराई येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचा हुबेहूब देखावा उभा केला. मुंबईतील बहुसंख्य जनता ही आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहे आणि आर्थिक अडचणीमुळे देशातील विविध तीर्थक्षेत्र पाहता येत नाहीत, त्यामुळे देशातल्या या विविध स्थळांचा आनंद सामान्य भक्तांना घेता यावा यासाठी मंडळाने मोठे मोठे देखावे उभारण्यास सुरुवात केली.

महत्त्वाच्या घडामोडी

संपादन
  • इ.स. १९२८ मध्ये मंडळाची स्थापना झाली
  • इ.स. १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात देशातील सर्वात पहिली २२ फूट उंच मूर्ती बनवली.
  • इ.स. २००२ मध्ये अमृत महोत्सवी वर्षात भव्य आणि नेत्रदीपक अशा सजावटीवर भर देऊन मदुराई येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचा हुबेहूब देखावा उभा केला.

हे सुद्धा पाहा

संपादन

सार्वजनिक गणेशोत्सव

संपादन

पुणे

मुंबई