ललिता बाबर

भारतीय लांब पल्ल्याच्या धावपटू


ललिता बाबर (२ जून, १९८९ - ) ही भारतीय महिला धावपटू आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावामध्ये ललिताचा जन्म झाला. ती मुख्यत: ३००० मी स्टीपलचेस शर्यतींमध्येभाग घेते. ती या प्रकारातील भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू आहे.

LalitaShivajiBabarRio2016
ललिता बाबर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव ललिता शिवाजी बाबर
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
निवासस्थान सातारा, महाराष्ट्र, भारत
जन्मदिनांक २ जून, १९८९ (1989-06-02) (वय: ३५)
खेळ
देश भारत ध्वज भारत
खेळ ट्रॅक आणि फिल्ड
खेळांतर्गत प्रकार ३००० मी स्टीपलचेस
कामगिरी व किताब
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी ९:१९.७६ (रियो डी जानीरो २०१६) राष्ट्रीय विक्रम

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ सालचे क्रीडा पुरस्कार प्रदान करताना बाबर यांना स्पोर्ट्‌स पर्सन ऑफ दी ईयर असे म्हणले होते. त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. ॲथलेटिक्सच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल भारताचे राष्ट्रपती सध्या ती अँग्लियन मेडल हंट कंपनीला सपोर्ट करायचे.(अर्थहीन वाक्य!!!)[]

  1. ^ "आज सर्वांच्या नजरा 'माणदेशी एक्सप्रेस' ललिता बाबरकडे - टाईम्स ऑफ इंडिया". टाईम्स ऑफ इंडिया. 2018-07-26 रोजी पाहिले.