लग्न नावाची गोष्ट हा म्हाळसाकांत कौसडीकर करत असलेला एक मराठी एकपात्री नाट्यप्रयोग आहे.

लग्न हा विषय विविध पैलू आणि पदर असणारा एक विषय आहे. लग्नसंबंधातील नात्यांभोवती फिरणारे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचा वेध घेणारे हे ‘लग्न नावाची गोष्ट’ नावाचे एकपात्री नाटक आहे. नाटकाचे लेखन म्हाळसाकांत कौसडीकरांचे असून ते यात ३६ पात्रांच्या भूमिका करतात. प्रत्येक पात्राची देहबोली, आवाज व हावभाव यांना अंगभूत अभिनयकौशल्याची जोड देत म्हाळसाकांत एक वेगळाच नाट्यानुभव देतात.

लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात होणारे बदल या नाट्यातून विनोदी पद्धतीने उलगडण्यात येतात. नवरा-बायकोचे नाते, सासू-सुनेच्या नात्यातला कडवटपणा, मुलीचे लग्न झाल्यावर तिला सासरी पाठवताना पाणावणारे डोळे या गोष्टींतला विनोद कौसडीकर सादर करतात. तरुण वयातील अजयची कथा सांगत कौसडीकर मंचावर प्रवेश करतात. त्यानंतर त्याचे आई-वडील, सासू-सासरे, वयस्क शेजारी, ४० वर्षांतंतरचा अजय अशी ३६ पात्रे ते साकारतात