लक्ष्मी होल्मस्ट्रोम (तमिळ अनुवादक)

लक्ष्मी होल्मस्ट्रोम (१९३५:भारत - ६ मे, २०१६) या भारतीय साहित्यिक होत्या. यांनी तमिळ साहित्याचे इंग्लिशमध्ये अनुवाद केला. अनुवादकलेच्या तत्त्वचिंतक म्हणूनही त्या ओळ्खल्या जातात. त्या मूळच्या ब्रिटिश असून त्यांचा जन्म भारतात झाला होता. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड याणि मद्रास विद्यापीठांतून झाले होते.

लक्ष्मी यांनी अनुवादित आणि संपादित केलेले आणि १९९० मध्ये पेंग्विनने प्रकाशित केलेले द इनर कोर्टयार्ड या स्त्री-कथांच्या पुस्तकासह त्यांनी अनुवादिलेली १७ पुस्तके प्रकाशित झाली.

तमिळमधील अंबाईसारख्या स्त्री-लेखिकांना लक्ष्मी यांच्या कथासंग्रहांचे अनुवाद लक्ष्मी यांनी केले. श्रीलंकेतील तमिळ कवींच्या कविताही लक्ष्मी यांनी अनुवादित केल्या.

लक्ष्मी यांनी वेळोवेळी अनुवादांविषयी केलेले लिखाण, वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतींतून किंवा अनुवादकलेविषयीच्या परिसंवादांतून तसेच मार्गदर्शनपर सत्रांतून त्यांनी व्यक्त केलेले विचार लक्ष्मी यांनी वेळोवेळी अनुवादांविषयी केलेले लिखाण अद्याप ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले नाही.

अनुवाद कधी एका भाषेच्या भल्यासाठी करायचा नसतो. ज्यातून अनुवाद केला आणि ज्या भाषेत अनुवाद झाला, त्या दोन्ही भाषांना काहीना काही लाभ अनुवादामुळे होत असेल, पण आदानप्रदान सुरू राहणे आणि साहित्यसंवादाचे पूल बांधले जाणे हा अनुवादांचा महत्त्वाचा हेतू आहे, असे लक्ष्मी म्हणत.