लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय

लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय हे कोकणातील देवरूख येथील संग्रहालय आहे. याचे उद्घाटन ११ मे २०१४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अभिनेते अमोल पालेकर यांच्या उपस्थितीत झाले. कोकणातील हे पहिलेच दृश्यकला संग्रहालय आहे. बॉम्बे स्कूल शैलीतील रघुवीर शंकर मुळगावकर, व्ही. एस. गुर्जर, सावळाराम लक्ष्मण हळदणकर, एस.एम. पंडित, ए. एच. मुल्लर, मुरलीधर रामचंद्र आचरेकर, बाबुराव पेंटर, दीनानाथ दलाल, क. र. केतकर, गणपतराव वडणगेकर, दादीसेठ ईरुक्शा, ईरुक्शा पेस्तनजी, ‌पेस्तनजी बोमनजी अशा चित्रकारांच्या तसेच समकालीन कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांची चित्रे आणि शिल्पे येथे प्रदर्शित आहेत.[]

संदर्भ

संपादन