लंगडा आंबा ही बनारस क्षेत्रात पैदा होणाऱ्या आंब्याची एक जात आहे. हा आंबा मौसमात देशाच्या सर्व भागात पाठवला जात असल्याने सर्वत्र मिळतो. महाराष्ट्रात होणाऱ्या आंब्यांपेक्षा हा अनेक पटीने स्वस्त असतो. चवीला हा आंबा कोणत्याही आंब्यापेक्षा सुंदर असतो पण या आंब्याबद्दल ग्राहकांना जास्त माहिती नसल्यामुळे त्याचा पिकल्यानंतर हिरवाच रंग राहणे तसेच गोल आकार इ मुळे अत्यंत चविष्ट असूनही यास जास्त मागणी नसते. तसेच पातळ सालीमुळे वाहतूकीत आंबा खराब होण्याचा धोका जास्त असतो म्हणून व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरात आंबा विकत घेतात. हा आंबा पिकल्यानंतर लगेचच खावा लागतो नाहीतर लगेच खराब होतो.

आंब्याच्या अन्य जाती : - केसर, गधेमार, गुलाबखास, चौसा, तोतापुरी, दशहरी, नीलम, पायरी, मानकुराद, रत्ना, राजापुरी, रायवळ, सफ़ेदा, साखरगोटी, सिंदुरी, हाथीझूल, हापूस(अल्फान्सो), हिमसागर, इत्यादी. लंगडा आंबा या सगळ्यांपेक्षा चवीला जास्त गोड असल्याचे मानले जाते.हा आंबा खायची एक वेगळी अशी पद्धत असते या आंब्याची साल अतिशय पातळ असते म्हणून हा आंबा खाताना जर केळी सारखा हाताने साल काढून खाल्ला तर खाण्याचा एक वेगळाच असा आनंद मिळतो. हा आंबा चोखुन खाता येत नाही.