रोहिणी (रक्तवाहिनी)

(रोहिनी या पानावरून पुनर्निर्देशित)

या रक्तवाहिन्या हृदयापासून उगम होऊन अन्य अवयवांकडे जातात. रोहिणी ही शुद्ध रक्त वाहून नेणारी रक्त वाहिनी असते.(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी-पल्मोनरी आर्टरी) त्या चित्रात लाल रंगाने दर्शविल्या जातात. या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब असतो. हृदयाचे आकुंचन होताना असणारा उच्चतम दाब प्रकुंचनीय दाब म्हणून ओळखला जातो.

मुख्य रोहिणी

संपादन

शरीरातील रक्त हृदयाकडून इतर भागाकडे वाहून नेणा‍ऱ्या रक्तवाहिनीस रोहिणी असे म्हणतात. रोहिणीमधील रक्त दाबाने वाहते. बहुदा, रोहिणीमधील रक्तामध्ये २० मिलि प्रति शंभर मिलिलिटर एवढा प्राणवायू असतो. फुफ्फुस्रोहिणीमधील रक्तामध्ये १५ मिलि प्रतिशंभर मिलिलिटर प्राणवायू असतो. पाच टक्के कार्बन डायऑक्साइड फुफ्फुसरोहिणीमध्ये असतो. रोहिणीच्या भित्तिका तीन थरांच्या आणि जाड असतात. नीला याच तीन थरांनी बनलेली असते.पण नीलेच्या भित्तिका त्यामानाने पातळ असतात.

रक्तवाहिन्या

संपादन

महाधमनी

संपादन