रोहिणी व्रत
पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून स्त्रिया हे व्रत करतात. जरी सामान्य व्रत असले तरी या व्रताला एखाद्या सणासारखे महत्त्व आहे. जेव्हा सूर्योदयानंतर पाठोपाठ रोहिणी नक्षत्र उगवते, त्या दिवशी हे रोहिणी व्रत करतात. जैन लोकांमध्ये हे प्रत विशेषेकरून केले जाते. या दिवशी ते भगवान वासुपूज्याची (जैनांचे १२वे तीर्थंकर) पूजा करतात.