रोमी गिल
रॉमी गिल (एमबीई) या भारतात जन्मलेल्या ब्रिटिश आचारी आणि स्वयंपाकशिक्षिका आहेत. त्या थॉर्नबरी, साउथ ग्लॉस्टरशायर येथे राहतात. त्यांनी थॉर्नबरी येथे रोमीज् किचन हे होटेल सप्टेंबर २०१३ मध्ये उघडले. त्या रेस्टॉरंटच्या मालक आणि मुख्य आचारी आहेत. यूके मधील रेस्टॉरंटच्या काही भारतीय आचारी/मालकांपैकी त्या एक आहेत. २०१६ मध्ये राणीच्या ९० व्या वाढदिवसाच्या सन्मान यादीमध्ये एमबीई म्हणून नियुक्त झाल्या होत्या. रोमी सध्या त्यांचे पहिले स्वयंपाक पुस्तक लिहित आहे, जे २०१९ मध्ये प्रकाशित होणे अपेक्षित आहे.[ दुजोरा हवा]
रोमी गिल | |
---|---|
जन्म |
मे 1971 (age अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "१")अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२" [१] पश्चिम बंगाल, भारत |
संकेतस्थळ www | |
पाककृती कारकीर्द | |
पाककला शैली | भारतीय पाककृती |
सुरुवातीचे जीवन
संपादनगिल भारताच्या पश्चिम बंगालमधील बर्नपूरमध्ये वाढली जिथे तिने आपल्या आईकडून स्वयंपाक शिकला.
१९९३ मध्ये जेव्हा गिल यूकेला गेले तेव्हा [२] तिने मित्रांसाठी डिनर पार्टीज होस्ट करण्यास सुरुवात केली, नंतर कुकरीचे वर्ग चालू केले ज्यामुळे तिला स्वतः बनवलेले सॉस, लोणचे, चटणी आणि मसाला विकण्यास सुरुवात केली. त्यांनी इंग्लंडमध्ये स्वयंपाकाची प्रात्यक्षिके दिली आणि सप्टेंबर २०१३ मध्ये तिने पहिले रेस्टॉरंट, रोमीज् किचन उघडले.
संदर्भ
संपादन- ^ "Romy GILL - Personal Appointments (free information from Companies House)". Companies House. 10 March 2020 रोजी पाहिले.
- ^ Platt Leonard, Julia (5 September 2019). "How the food of her childhood saved chef Romy Gill". The Independent. 10 March 2020 रोजी पाहिले.