रेशीम उत्पादन
रेशीम उत्पादन हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय याप्रमाणे हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन किक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकयांस कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते. पट्टा पद्धतीस अत्यंत कमी पाणी लागते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात ३ एकर तुती जोपासता येते. .तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १५ वर्षेपर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही. तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकयांस देखील हा व्यवसाय करता येतो. कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून तो जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय व ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकयांना देखील हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. पट्टा पद्धतीने तुतीची आंतरमशागत मजूंराएवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करून घेता येते. यामुळे मजूरी खर्चात व वेळेत मोठया प्रमाणात बचत होते. पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेऊन उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने ४५० टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील २४ दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या २४ दिवसांपैक सुरुवातीचे १० दिवस शासना मार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या १४ दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात २५ टक्के पर्यंत वाढ होईल. 22.शेतीमध्ये रेशीम कोशा शिवाय अवघ्या १४ दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. तसेच महिन्यात रविवारप्रमाणे चार दिवस सुट्टी उपभोगता येते. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पद्धतीने होत असून त्याचा दर रु. ६५/- ते रु.१३०/- प्रती किलो आहे.
इतर फायदे
संपादन- रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून १ ते दीड लिटर दूध वाढते.
- वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करून उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
- तुतीच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुद्धा वापरता येते.
- संगोपनाक वापरलेल्या चोथा करून त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
- रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
- तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासनामार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु ३५००/- ते ४५००/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
- तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्त्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.
- विदेशात तुतीच्या पानांचा चहा (मलबेरी टी) करतात. शिवाय वाईन करतात.
- कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.
- एका तुतीच्या झाडापासून सुमारे १५ वर्षे उत्पन्न मिळत राहते.
संदर्भ
संपादन- रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन
- http://mr.vikaspedia.in/