रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इंग्लिश: Railtel Corporation of India) ही भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित येणारी मुख्यत्वे दूरसंचार सेवांसाठी स्थापन केलेली कंपनी आहे. २००० साली स्थापन करण्यात आलेल्या रेलटेलचे उद्दिष्ट रेल्वेला अधिक कार्यक्षम व अद्ययावत बनवण्यासाठी देशभर इंटरनेट, दूरसंचार व मल्टिमीडियाच्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे हे आहे. नवी दिल्ली येथे मुख्यालय तर गुरगाव, मुंबई, हैदराबादकलकत्ता येथे क्षेत्रीय कार्यालये असलेली रेलटेल ही भारतामधील मिनिरत्न-१ कंपन्यांपकी एक आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
मुख्यालय गुरगांव, भारत
महसूली उत्पन्न १०३८ कोटी रुपये
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
२१८ कोटी रुपये
निव्वळ उत्पन्न ११२ कोटी रुपये
मालक भारतीय रेल्वे
संकेतस्थळ railtelindia.com

बाह्य दुवे

संपादन