रेणू गावसकर या एक मराठी लेखिका आणि समाजसेविका आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. (तत्त्वज्ञान) ही पदवी मिळवली आहे. त्या आम्ही युवाया न्यासाच्या अध्यक्ष आहेत. रेणू गावसकर या मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या एकलव्य न्यासाच्याही प्रमुख आहेत.

पुस्तके संपादन

  • आमचा काय गुन्हा?
  • गोष्टी जन्मांतरीच्या
  • निःशब्द झुंज
  • हरवले ते गवसले

पुरस्कार संपादन

  • अनाथ मुलांसाठी काम करत असल्याबद्दल आदर्श पालक पुरस्कार
  • सराहनीय शैक्षणिक कार्यासाठी आदिशक्ती पुरस्कार
  • काकासाहेब गाडगीळ पुरस्कार
  • नातू फाउंडेशनचा पुरस्कार (२०१२)
  • रमा श्रीधर स्मृती न्यासाचा पुरस्कार (इ.स. २००५)
  • विद्या व्यास पुरस्कार (इ.स. २००५)
  • उत्कृष्ट कथाकथनकारासाठीचा वैभव फळणीकर पुरस्कार (इ.स. २००५)
  • अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी सुसान ॲन्थनी पुरस्कार