रेणुका नदी
रेणुका ही बीड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम अंबाजोगाई जवळ झाला आहे. बालाघाटच्या डोंगररांगांमधून ही नदी वाहते. बीड जिल्ह्यात या नदीला रेणा नदी म्हणून ओळखले जाते.ही मांजरा या नदीची उपनदी आहे.लातूर तालुक्यातील भातांगली येथे या नदीचा मांजरा नदीशी संगम होतो.या नदीवर रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प आहे. या नदीची एकूण लांबी ४१ किलोमीटर आहे.