रॅडिसन ब्लु हॉटेल (अमृतसर)

रॅडिसन ब्लु हॉटेल, अमृतसरमधील ऐशारामी होटेल आहे. याची मांडणी भपकेबाज पद्दतिची आणि अगदी आधुनिक पद्दतीने आणि उच्च दर्जाचे तांत्रिक ज्ञान वापरून सजावट केलेली आहे तसेच आतील शोभा देखणी आहे.[]

ठिकाण

संपादन

हे हॉटेल अमृतसर शहराच्या आंतराष्ट्रीय विमानतळाला लागूनच आहे. या हॉटेलचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण असणारी ठिकाणे म्हणजे विरासत हवेली २० किमी, अल्फा वन अमृतसर, १५ किमी., महाराजा रंजीत सिंह संग्रहालय १५ किमी, सुवर्ण मंदिर १२ किमी., श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ साधारण ५०० मी., अमृतसर जंक्शन रेल्वे स्थानक साधारण १० किमी. अमृतसर बस डेपो साधारण १२ किमी. अंतरावर आहेत.

सुविधा

संपादन

या हॉटेल मध्ये खान पान व्यवस्था, स्पा, पोहण्याचा तलाव, स्वास्थ्य केंद्र, सभा ग्रह, बकेट हॉल आहेत. खान पान व्यवस्थेत टवोलो मोनदो, हे रेस्टोरंट पूर्ण दिवसभर बफेट सह सर्व प्रकारे खान पान व्यवस्था करते.[] पर्यटकांना खुल्या वातावरणात खान पानासाठी बसण्याची इच्छा असेल तर तीही पूर्ण करतात. पूर्वेकडील देशातील पद्दतीने बुफ्फे व्यवस्था हवी असेल तर त्यासाठी सुंदर असे वाल ऑफ एशिया हे रेस्टोरंट तत्पर आहे.[] प्रूफ हे हॉटेल परिसरात पर्यटकांना आराम दायक व मन रिंजंविणारे आणि अल्पोपअहार आणि मदिरा व्यवस्था असणारे ठिकाण आहे. या हॉटेलमध्ये चैतन्य पूर्ण सर्व सुविधायुक्त सभा ग्रह आणि बफेत हॉल आहे. या हॉटेल मध्ये दोन अतिशय हिरवळीचे बगीचे, दोन मेजवानी खोल्या (पार्टी रूम),दोन सभा खोल्या, आहेत. व्यायामासाठी स्वास्थ्य केंद्र आहे. अथिति खूप थकलेले असतील आणि त्यांना विश्रांतीची, मनावरील तान कमी करण्याची गरज असेल तर ते विस्तीर्ण अशा पोहण्याच्या तलावात आरामशीर डुंबू शकतात. स्पा मध्ये तुम्ही विविधी शारीरिक चिकीछा करू शकता आणि थेरपीचाही अनुभव घेऊ शकता. कलात्मकेच्या सुविधेसह व्यवसाय केंद्र ही ठेवलेले आहे. सुवर्ण मंदिरात जाऊन येण्याची वाहाण व्यवस्था ही आहे. इतर सुविधा म्हणजे २४ तास खोलीवर जेवण व्यवस्था पुरविणे, प्रवाशी कक्ष, चलन एक्सचेंज, इंटरनेट, खोली सेवा आणि बोलवता क्षणी डॉक्टर या सुविधा आहेत.[]

खोल्या

संपादन

या हॉटेल मध्ये विविध प्रकारच्या १२३ खोल्या आहेत. त्यात सुपीरियर रूम, प्रीमियम रूम,व्यवसाय वर्ग रूम, स्टुडिओ सूट, एक्झिक्युटिव रूम, आणि प्रीमियर सूट यांचा समावेश आहे. सर्व रूम सुंदर पद्दतीने सजविलेल्या, वूडन फ्लोरिंग असणाऱ्या, आरामदायक आहेत. या खोल्यांना राजघराण्यासारख्या (Royal) डोळ्यांना दीपविणाऱ्या मनाला रिंजंविणाऱ्या आकर्षक सजावटीच्या सुविधा आहेत. शिवाय स्वागत कक्षात अथिती येताच त्यांच्या हातात स्वागतपर थंड पेय दिले जाते.दोन मिनरल पाण्याच्या बाटल्या, विनंतिंनुसार फॅक्स, येणारे फॅक्स मोफत पोहचवणे, या सुविधा आहेत. सुपीरियर रूम, प्रीमियम रूम,व्यवसाय वर्ग रूम, स्टुडिओ सूट, एक्झिक्युटिव रूम, आणि प्रीमियर सूट या रूम मध्ये DVD प्लेयर आणि मुव्हीची व्यवस्था आहे. प्रीमियर सूट मध्ये एक जास्त खोली आहे. बसण्यासाठी ऐसपैस जागा, व्हरांडा, स्वायपांक खोली, स्वतंत्र ड्रेसिंग रूम या सुविधा आहेत.

सुविधा

संपादन

या हॉटेल मधील सुपीरियर रूम, व्यवसाय रूम, प्रीमियम रूम, सुपीरियर रूम, स्पेशल रूम मध्ये खालील सुविधा आहेत.

  • एर कंडिशनर
  • दूरचित्रवाणी
  • इंटरनेट / ब्रोड बँड
  • इस्त्री
  • मिनी बार
  • सेफ
  • दूरध्वनी
  • इस्त्रीचे मेज
  • वाय फाय असेस सुल्कासह
  • हेयर ड्रायर
  • दैनिक
  • म्यूजिक सिस्टम
  • मिनरल वॉटर
  • स्वछताग्रह,
  • इंटर कॉम
  • धोबी
  • फ्लॅट स्क्रीन दूरचित्रवाणी
  • हंगर्स
  • इन रूम मेनू
  • इन रूम इलेक्ट्रोंनिक सेफ
  • लौंडरी ब्याग
  • सामान ग्रह दूरध्वनी कनेक्षण
  • सॅटलाइट दूरचित्रवाणी
  • शॉवर
  • आथिति स्लीपर्स
  • चहा / कॉफी मेकर
  • टेंपरेचर कंट्रोलर
  • वेघिंग मसीन
  • वूडण फ्लोअर
  • बेडसाइड कंट्रोल
  • खाजगी स्नान ग्रह
  • सामान रॅक
  • लिखाण मेज / स्टडी टेबल

वरील सुविधा सुपीरियर रूम मधील आहेत. याशिवाय कमी अधिक प्रमाणात इतर रूम मध्ये ही सुविधा आहेत.

इतर सुविधा

संपादन

२४ तास स्वागत कक्ष, २४ तास सुरक्षा व्यवस्था, २४ तास रूम सेवा, प्रवाशी मार्गदर्शन टेबल, वाहनतळ, हमाल,वाहतूक सेवा, मोफत पिकअप व ड्रॉप. किड्स पूल, जिम, दारवान, लिफ्ट, प्रदूषण मुक्त रूम, हाऊस कीपिंग, या सुविधा आहेत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "होटल बूस्ट्स सूथिंग सेटिंग निअर अमृतसर एयरपोर्ट".
  2. ^ "रॅडिसन ब्लू अमृतसर: मिसिंग द पंजाब कल्चर". 2017-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-10 रोजी पाहिले.
  3. ^ "वाल ऑफ एशिया रेस्टोरंट इन रॅडिसन ब्लु हॉटेल".
  4. ^ "हॉटेल रॅडिसन ब्लु अमृतसर फैसिलिटीज".