योहान रुडॉल्फ जेलेन (स्वीडिश भाषेत:शेलेन) (१३ जून, १८६४ - १४ नोव्हेंबर, १९२२) हे स्वीडिश समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी होते. त्यांनी "भू-राजकारण" हा शब्द तयार केला. ॲलेक्झॅंडर फॉन हम्बोल्ट, कार्ल रिटर आणि फ्रेडरिक राट्त्सेल यांच्याबरोबर जेलेन यांनी जर्मन जिओपॉलिटिक (Geopolitik)चा पाया घातला. अडॉल्फ हिटलर व नाझी पक्षावर जेलेन आणि हौशोफर यांच्या विचारांचा प्रभाव होता आणि युरोपमध्ये स्वतःच्या आक्रमक विस्ताराचे समर्थन करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाझी पक्षाने या सिद्धांताचा वापर केला.[१]

जीवनसंपादन करा

योहान रुडॉल्फ जेलेन यांचा जन्म १३ जून १८६४ रोजी स्वीडन मधील तोर्सो येथे झाला. १८८० मध्ये त्यांनी स्कारा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी उप्सला विद्यापीठातून मॅट्रिक पूर्ण केले. १८९१ मध्ये ते उप्सला विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएच.डी.) झाले. ते १८९०-१८९३ दरम्यान तेथे सहयोगी प्राध्यापक होते.[२]

  1. ^ "RUDOLF KJELLÉN – THE SWEDISH 'FATHER OF GEOPOLITICS'". Världsinbördeskriget (इंग्रजी भाषेत). 2011-02-09. 2018-03-14 रोजी पाहिले.
  2. ^ LLC, Revolvy,. ""Rudolf Kjellén" on Revolvy.com". www.revolvy.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-14 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)