रीठा
(रिठा या पानावरून पुनर्निर्देशित)
रीठा (संस्कृत:अरिष्ट, फेनिल) ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. डोक्यास लावण्याच्या शिकेकाईतील एक घटक आहे.
रिठा हा वृक्ष सॅपिंडेसी कुळातला हा वृक्ष सदाहरित वनांत आढळतो. या वृक्षाचे मूळ स्थान दक्षिण भारत आहे. याची उंची साधारणत: २० ते ३० फुटांपर्यंत असते.याची फुले पाकळ्या असलेली व पांढऱ्या रंगाची असतात. फळे पिकल्यावर पिवळसर हिरवी दिसतात. याच्या फळामध्ये काळ्या रंगांची गुठळी निघते .ही गूठळी साधारणपणे कपडे धुण्यासाठी वापरतात.