रिचर्ड स्टॉलमन

(रिचर्ड स्टालमन या पानावरून पुनर्निर्देशित)

रिचर्ड मॅथ्यू स्टॉलमन (जन्म १६ मार्च १९५३) हे एक संगणकतज्‍ज्ञ तसेच "मुक्त आणि व्यक्त संगणकप्रणाली"चे (फ्री ॲण्ड ओपन सोर्स स़ॉफ्टवेयरचे) प्रचारक आहेत. ज्या आज्ञावल्या वापरण्यास, अभ्यासण्यास, वितरणास आणि सुधारणेस कोणतीही आडकाठी न करता वितरित करण्यात येतात त्यांना मुक्त आज्ञावल्या/ संगणकप्रणाल्या असे म्हणतात. स्टॉलमन हे ग्नू प्रकल्पाचे प्रणेते आणि फ्री सॉफ्टवेयर फाउण्डेशनचे संस्थापक आहेत. ते ग्नू सार्वजनिक परवान्याचे लेखकही आहेत. त्यांनी ग्नू कंपायलर कलेक्शन आणि ग्नू इमॅक्स ह्या आज्ञावल्या तयार केल्या आहेत.

रिचर्ड स्टॉलमन
जन्म रिचर्ड मॅथ्यू स्टॉलमन
मार्च १६, १९५३
न्यू यॉर्क शहर
राष्ट्रीयत्व अमेरिकी
टोपणनावे RMS
नागरिकत्व अमेरिका
प्रसिद्ध कामे मुक्त सॉफ्टवेअर मोहीम (फ्री सॉफ्टवेअर GNU), Emacs, GCC
संकेतस्थळ
https://stallman.org/

बाह्य दुवा संपादन

रिचर्ड स्टॉलमन ह्यांचे व्यक्तिगत संकेतस्थळ