रा.वि. मराठे
रामचंद्र विनायक मराठे तथा रा.वि.मराठे (जन्म - ५ एप्रिल १८८२) हे कोशकार होते. त्यांनी 'स्थापत्य-शिल्प' तसेच 'पुरातत्त्वशास्त्र' या विषयांवरील इंग्रजी-मराठी शब्दांचे संकलन करून कोशनिर्मिती केली.
शिक्षण व नोकरी
संपादनपुणे येथील इंजिनिअरींग कॉलेज मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका (डी.सी.इ.) संपादीत केल्यावर ते शासकीय नोकरीत रुजू झाले. गुजरात व महाराष्ट्रात विविध पदांवर ३४ वर्षे नोकरी केल्यावर ते १९४७ साली निवृत्त झाले.
कोश संपादन
संपादन१९२८ पासून नोकरीवर असताना छंद म्हणून गोळा केलेल्या शब्दसंग्रहाचे निवृत्तीनंतर संकलन करून त्यांनी पुस्तकात रुपांतर केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने हा कोश इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश (सचित्र) या नावाने इंग्रजीत प्रसिद्ध केला. पुढे पुरातत्त्वशास्त्र या विषयावरील शब्दांचे संकलन करून १९८३ साली त्यांनी इंग्रजी-मराठी पुरातत्त्व कोश (सचित्र) हा आणखी एक लहान कोश प्रसिद्ध झाला.
पुस्तके
संपादन- इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश (सचित्र), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, १९६५, पृ.२९०
- इंग्रजी-मराठी पुरातत्त्व कोश (सचित्र), मंजिरी श्री मराठे, १९८३, पृ.१३०