राष्ट्रीय महामार्ग ४
अंदमान आणि निकोबारमधील एक राष्ट्रीय महामार्ग
(रा.म.क्र. ४ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग ४ (जुने क्रमांकन) याच्याशी गल्लत करू नका.
राष्ट्रीय महामार्ग ४ (National Highway 4) हा भारताच्या अंदमान आणि निकोबार ह्या राज्यामधून धावणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग अंदमानमधील सर्व प्रमुख शहरांना राजधानी पोर्ट ब्लेअरसोबत जोडतो.
राष्ट्रीय महामार्ग ४ | |
---|---|
राष्ट्रीय महामार्ग ४ चे नकाशावरील स्थान | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | २३० किलोमीटर (१४० मैल) |
देखरेख | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण |
सुरुवात | मायाबंदर |
शेवट | पोर्ट ब्लेअर |
स्थान | |
शहरे | बाराटांग, रंगत |
राज्ये | अंदमान आणि निकोबार |
इतिहास
संपादन२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलण्यापूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग २२३ ह्या नावाने ओळखला जात असे. तसेच २०१० सालापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ४ ह्या नावाने ओळखला जात असणारा मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग ४८चा भाग आहे.